Sunday, May 19, 2024

Latest Posts

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खासदार ब्रिजभूषण सिंह यांना आमंत्रित केल्याने नव्या वादाला सुरुवात

Brij Bhushan Sharan Singh : महाराष्ट्राच्या पवित्र भूमिला पैलवाणाचा ऐतिहासिक वारसा कोल्हापूरच्या मातीत लाभला आहे. याचं कोल्हापुरच्या खासबाग मैदानात प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा ( Women Maharashtra Kesari)  सुरू आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे लागलं आहे

Brij Bhushan Sharan Singh : महाराष्ट्राच्या पवित्र भूमिला पैलवाणाचा ऐतिहासिक वारसा कोल्हापूरच्या मातीत लाभला आहे. याचं कोल्हापुरच्या खासबाग मैदानात प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा ( Women Maharashtra Kesari)  सुरू आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे लागलं आहे. महाराष्ट्र महिला कुस्ती स्पर्धा रोजच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत आहे. कुस्ती सुरु असताना काही महिला आक्रमकपणे थेट कार्यक्रमस्थळी धडकल्या. या महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिला आणि स्पर्धेचे आयोजक, पोलीस यांच्यात झटपट आणि बाचाबाचीही झाली.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक आरोपांप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर कुस्तीगीरांचे आंदोलन सुरू आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या आरोपांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांना घरले असताना, कोल्हापुरात खासबाग मैदानात सुरू असलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे बक्षीस वितरण ही त्यांच्या हस्ते होणार असल्याने कोल्हापुरातील काही सामजिक महिला आणि राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी थेट खासबाग मैदानात घुसून दीपाली सय्यद यांना या प्रकरणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. खासदार ब्रिजभूषण सिंह यांना काल्हापुरात नं येऊन देण्याची भूमिका राजमाता जिजाऊ ब्रिगेट व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

१८ जानेवारी २०३ रोजी विनेश फोगाट (Vinesh Phogat) , बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) याच्यासोबत आणखीन ३० कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरुद्ध धरणे आंदोलन केले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या सात कुस्तीपटूंनी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यामुळे आता हा वाद किती चिघळतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

‘एकनाथ शिंदे सावध राहा’, राज ठाकरेंनी दिला मोलाचा संदेश

राज्यात नवं संकट? अवकाळी पावसाचा घातला धुमाकूळ!

CSK vs RR आमनेसामने, कोणाचं पारडं होईल भारी?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss