Saturday, July 27, 2024

Latest Posts

परळीतील अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉपीचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर

बीड जिल्ह्यातील परळी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात एक अनोखा प्रकार घडला आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात एक अनोखा प्रकार घडला आहे. महाविद्यालयातील मुलांनी चक्क मोबाइल समोर ठेवून कॉपी केल्याचे उघड झाले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात (Education Sector) एकच खळबळ उडाली आहे. तसेच डमी विद्यार्थी बसवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) संलग्न परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. विशेष बाब म्हणजे, विद्यार्थी करत असलेल्या कॉपीच्या घटनेचं व्हिडीओसह चित्रण करीत परीक्षार्थीचे मोबाइल (Mobile) जप्त करणाऱ्या सहकेंद्रप्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. बीड जिल्ह्यात देखील विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयात परीक्षा सुरु आहेत. असे असताना परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी चक्क मोबाईल समोर ठेवून पेपर लिहीत आहेत. या घटनेचा व्हिडिओ एका सहकेंद्रप्रमुखाने काढला आहे. संबंधित विध्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई न करता हा प्रकार समोर आणणाऱ्या सहकेंद्रप्रमुखाचीच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदली केली आहे. हा सर्व प्रकार कुलगुरूंना समजल्यानंतर त्यांनी काफडकी बदली केली आहे. हा सर्व प्रकार कुलगुरूंना समजताच त्यांनी परीक्षा संचालकांची कानउघाडणी करीत परीक्षेसाठी बैठे पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेची चौकशी करण्याची मागणी करत सहकेंद्रप्रमुखासह अधिसभा सदस्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले आहे.

१२ डिसेंबर पासून विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. या अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा. दशरथ रोडे यांची सहकेंद्रप्रमुख म्हणून परीक्षा विभागाने नियुक्ती केली होती. त्यानुसार रोडे परीक्षा केंद्रावर गेले.त्यानंतर परीक्षा केंद्रावर जाऊन पाहणी केल्यानंतर पर्यवेक्षकांसमोर विद्यार्थी थेट मोबाइल समोर ठेवून उत्तरपत्रिका लिहीत असल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ काढला आणि विद्यार्थ्यांचे मोबाइल जप्त केले. कॉपीच्या प्रकारामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

Nagpur मध्ये लग्न समारंभ आटोपून परत जाताना झाला भीषण अपघात, सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

Rohit Sharma ला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे MI ला मोठे नुकसान तर CSK ला झाला फायदा, इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss