Saturday, July 27, 2024

Latest Posts

Nagpur मध्ये लग्न समारंभ आटोपून परत जाताना झाला भीषण अपघात, सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

सध्या महामार्ग आणि अपघात हे जणू काय नवीन समीकरणच बनला आहे. मागील काही दिवसांमध्ये या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे.

सध्या महामार्ग आणि अपघात हे जणू काय नवीन समीकरणच बनला आहे. मागील काही दिवसांमध्ये या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे. अश्यातच आता नागपूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) काटोलमध्ये (Katol) क्वॉलीस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

नागपूरच्या काटोल तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. ताराबोडी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत लग्न समारंभ आटोपून गावी परत जाणाऱ्या एकाच गावातील ६ लोकांचा मृत्यू झाला. अपघातात निधन झालेले सर्व जण नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपठार बाजार गावातील रहिवासी होते. मृतकामध्ये दोन सख्या चुलत भावाचा समावेश. हा अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका क्वॉलीस कारमधून ७ जण नागपूरहून काटोलच्या दिशेनं प्रवास करत होते. नागपुरात एका लग्नाही हे सातही जण उपस्थित राहण्यासाठी आले होते. रात्री उशीरा नागपुरातील लग्नाचा कार्यक्रम आटपून सातहीजण आपल्या घरी निघाले होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळानं घाला घातला. नागपूरहून काटोलच्या दिशेनं जात असताना समोरून येणाऱ्या एका ट्रकनं क्वॉलीस गाडीला धडक दिली.

 

या अपघातात अजय दशरथ चिखले (वय 45), विठ्ठल दिगंबर थोटे (वय 45), सुधाकर रामचंद्र मानकर (वय 42), रमेश ओंकार हेलोंडे (वय 48), मयूर मोरेश्वर इंगळे (वय 26), वैभव साहेबराव चिखले (वय 32) यांचा मृत्यू झाला आहे. यामधील अजय चिखले आणि वैभव चिखले हे सख्ये चुलत भाऊ आहे. लग्न आटोपून आनंदात असणारे चिखले कुटुंबियांवर या घटनेनंतर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळल्यावर तात्काळ पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. यावेळी पोलिसांना स्थानिक नागरिकांनीही मदत केली. गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णालयात पाठवण्यात आले.

हे ही वाचा : 

Rohit Sharma ला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे MI ला मोठे नुकसान तर CSK ला झाला फायदा, इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स…

धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज उद्धव ठाकरे आक्रमक, काय आहे मागण्या घ्या जाणून सविस्तर माहिती…

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss