Monday, May 20, 2024

Latest Posts

सरकारी वकिलांचा समृद्धी महामार्गावर अपघात

या अपघाताबद्दल माहिती कळाल्यावर पोलीस आणि रुग्णवाहिका अपघातास्थळी दाखल झाली. जखमी झालेल्या व्यक्तींवर तिथेच प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर, वकील अजय मिसर यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. आता अजय मिसर आणि सहाय्यक वकील वाहनचालक यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला समृद्धी मार्गावर अपघात झाला.या अपघातामुळे अजय मिसर यांच्या पायांना आणि चेहऱ्याला दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरकारी वकील अजय मिसर हे श्रीरामपूर ते मुंबई असा प्रवास नाशिकमार्गाने करत होते. दुपारच्या सुमारास त्यांचा ताफा समृद्धी मार्गावरून जात होता. घोटीच्या मार्ग पार केल्यावर इगतपुरी येथील भरविणे बुद्रुक शिवारात त्यांची गाडी समोर असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात त्यांच्या खांद्याला मुका मार लागला आहे.

या अपघाताबद्दल माहिती कळाल्यावर पोलीस आणि रुग्णवाहिका अपघातास्थळी दाखल झाली. जखमी झालेल्या व्यक्तींवर तिथेच प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर, वकील अजय मिसर यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. आता अजय मिसर आणि सहाय्यक वकील वाहनचालक यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईपासून नागपूरपर्यंत महत्त्वाच्या शहरांना जोडणारा दुवा म्हणजे समृद्धी महामार्ग, अशी ओळख असली तरीही अपघातांचा मार्ग अशीही ओळख या महामार्गाची होत चालली आहे. महामार्गावरून वेगाने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने, येथे अपघातांची संख्या वाढत असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा: 

मराठा समाजाच्या पदरात निराशाच: प्रकाश आंबेडकर

सुप्रीम कोर्ट करणार नबाम रेबिया खटल्याचा पुनर्विचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss