Saturday, July 27, 2024

Latest Posts

बीडच्या सभेनंतर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली होती.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली होती. त्यांचा हा दौरा नुकताच संपला आहे. मराठा बांधवाना आरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी अनेक वेगवेगळ्या भागात सभा घेतल्या आहेत. काळ त्यांनी बीडमध्ये झालेल्या सभेत मोठी घोषणा केली आहे. २० जानेवारी २०२४ रोजी मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटी गावातून मुंबईमध्ये उपोषणासाठी येणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानात त्यांचे आंदोलन असणार आहे.

मागील काही महिन्यांपासून मनोज जरांगे हे अनके ठिकाणी सभा घेत आहेत. त्यामुळे ते आजारी पडले आहेत. बीडची सभा संपल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली आहे. बीडमधील सभा संपल्यानंतर आज मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अंगदुखी आणि खोकल्यामुळे त्यांच्या छातीत दुखू लागले. छातीत दुखायचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरला पोहचल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

मनोज जरांगे २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे जायला निघणार आहेत. मुंबईला पायी चालत जाणार असल्यामुळे त्यांना पोहचण्यासाठी पाच ते सहा दिवस त्यांना लागणार आहेत. २६ जानेवारीपासून त्यांच्या प्रत्यक्षात उपोषणाला सुरुवात होणार आहे. आंतरवाली सराटी गावातून निघाल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक गावातील लाखो मराठा बांधव जोडले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये पोहचेपर्यंत त्यांच्यासोबत लाखोपेक्षा जास्त मराठा बांधव जोडले जाणार आहेत. तसेच मराठा आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्यांची यादी पोलिसांनी मिळवली आहे. अनेकजण मुंबईला ट्रॅक्टर घेऊन येणार असल्याची चर्चा सगळीकडे आहे. त्यामुळे पोलीस देखील अलर्ट मोडवर आहेत. यासाठी पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवण्यासाठी सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

THANE: भिवंडीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व फन अँड फूड फेस्टिवल साजरा

MAHARASHTRA: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा अपघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss