Saturday, July 27, 2024

Latest Posts

राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर मी…काय म्हणाले Raj Thackeray?

बाबरी मशीद (Babri Masjid) पाडण्याच्या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते. त्यावेळी त्यांनी पाडलेल्या मशिदीची वीट सोबत आणली होती. ३२ वर्ष त्यांनी ती वीट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना देऊ असा प्रण बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केला होता.

हा ढाचा पाडल्याचा पुरावा

६ डिसेंबर १९९२ (6 December 1992) रोजी जे शिवसैनिक गेले होते, त्यात बाळा नांदगावकर होते. त्यांनी २ विटा आणल्या होत्या. त्यातली एक त्यांच्या घरी आहे आणि एक मला दिली. या विटेचं वजन बघा. मजबूत आहे कारण त्यावेळी टेंडर निघत नव्हते. हा ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. आता मला मंदिराची सुद्धा एक वीट आणायची आहे. बाळासाहेब असते तर त्यांना या सोहळ्याचा खूप आनंद झाला असता, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) माध्यमांशी बोलताना म्हणाले. राम मंदिराचे काम अजून पूर्ण झाले नाही, तर मी राम मंदिराच्या निर्माण कार्यातील एक घेऊन येईन, असे राज ठाकरे म्हणाले.

तो प्रसंग आठवला की फक्त….

तो प्रसंग आठवला की फक्त जय श्रीराम घोषणा ऐकू यायचा. आता ३२ वर्षे झाली. राज साहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात. २२ जानेवारी रोजी मंदिर लोकांसाठी खुलं झालं आणि २३ तारखेला बाळासाहेबांचा जन्मदिवस. त्यावेळी काय सुचलं माहिती नाही, पण मी आणली. मी माजगावमध्ये कार्यालय बांधलं, तेव्हा त्या कार्यालयाखाली ती वीट घातली होती. आता ते कार्यालय यशवंत जाधवांकडे आहे. असो हरकत नाही. तो माझा जुना सहकारी आहे. अशा भावना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडल्या.

हे ही वाचा:

रजनीकांतचा जबरदस्त अँक्शन असलेल्या ‘लाल सलाम’चा ट्रेलर प्रदर्शित

अनाथ मुलांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम – Aditi Tatkare

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss