Friday, May 10, 2024

Latest Posts

रजनीकांतचा जबरदस्त अँक्शन असलेल्या ‘लाल सलाम’चा ट्रेलर प्रदर्शित

सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांच्या ‘लाल सलाम’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे.लाल सलाम हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांच्या ‘लाल सलाम’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे.लाल सलाम हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.लाल सलाम या चित्रपटाच्या माध्यमातून रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने या चित्रपटाचे दिग्दर्शन करुन पुनरागमन केलं आहे.यांची मुलगी ऐश्वर्याचा आगामी ‘लाल सलाम’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात विक्रांत आणि विष्णू मुख्य भूमिकेत आहेत. रजनीकांत ही आपल्या मुलीच्या चित्रपटात दिसणार आहेत. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. खेळाच्या माध्यमातून धार्मिक सलोखा वाढवण्यावर हा चित्रपटाची कथा फिरते.मागील काही महिन्यांपासून या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

5 फेब्रुवारी रोजी ऐश्वर्या रजनीकांत आणि लाल सलामच्या टीमने चित्रपटाचा ट्रेलर युट्युबवर लाँच केला. लाल सलाम हा चित्रपट समाजासाठी एक चांगला संदेश देतो. तसचं या चित्रपटात  हार्ड-हिटिंग स्पोर्टस् ड्रामाही दाखवण्यात आला आहे.‘लाल सलाम’ च्या ट्रेलरची सुरुवात चित्तथरारक दाखवण्यात आली आहे.सुरुवातीला लोक घनदाट जंगलात कोणाला तरी शोधत असतात.त्यानंतर एका कारजवळ बॉम्बचा स्फोट होतो. पुढच्या सीनमध्ये विष्णूसह अनेक लोक क्रिकेट खेळताना दिसत आहेत. यानंतर हत्याकांड, जाळपोळ, दंगली पाहायला मिळतात. धर्मद्वेषाच्या राजकारणाचा कोनही चित्रपटात पाहायला मिळतो.

चित्रपटात सुपरस्टार रजनीकांतसह विष्णू विशाल, विक्रांत, विग्नेश, लिविंगस्टन, सेंथिल, जीविता, केएस रविकुमार आणि  थंबी रमैय्या हे कलाकार देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. दिग्गज भारतीय क्रिकेटपटू कपिल देव हेदेखील या चित्रपटात कॅमिओ करणार आहेत. या चित्रपटात कपिल देव हे क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये रजनीकांत आणि कपिल देव हे एकाच दृष्यात दिसले आहेत.

चित्रपटाचा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे. लाल सलाम 9 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर रिलीज होण्याच्या अवघ्या 4 दिवस आधी ट्रेलर लॉन्च करण्यात आला. चित्रपटाचे पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. ए. आर. रहमानने त्याचे संगीत दिले आहे.गेल्या वर्षी रजनीकांत यांचा ‘जेलर’हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. लाल सलामशिवाय, रजनीकांत हे  ‘वेट्टीयान’ या  चित्रपटदेखील दिसून येणार आहेत.

हे ही वाचा:

अनाथ मुलांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम – Aditi Tatkare

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग – Dr. Tanaji Sawant

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss