प्रताप पाटील चिखलीकर यांचा प्रचार करण्यासाठी नांदेड येथे अमित शाह यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विकासाची एक्स्प्रेस फक्त मोदींचीच असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कॉंग्रेसची अवस्था ना घर का घाट का, अशी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जनसमुदायाला संबोधित करतांना कॉंग्रेसवर भाष्य केले. अशोक चव्हाण कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यावर कॉंग्रेसची काय अवस्था झाली आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे, असे यावेळी जनतेकडून वदवून घेतले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वांना मेहनत घ्यायची आहे. चिखलीकर यांना निवडून द्यायचं आहे. या वर्षीची निवडणूक ही नरेंद्र मोदी यांना जिंकवून देण्यासाठीची निवडणूक आहे. यावेळी अमित शाह यांनी बोलतांना महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस वंदन केले. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी सध्या अस्तित्वात आहे. तसेच अर्धी कॉंग्रेस महाविकास आघाडीत असल्याचे अमित शाह म्हणाले. तीन तिगाडा, काम बिगाडा ही स्थिती सध्या आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे राज्याचा विकास करू शकत नाहीत, असा हल्लाबोल यावेळी अमित शाह यांनी केला.