Tuesday, April 16, 2024

Latest Posts

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील घरी बॉम्ब असल्याचा फोन, धमकीचा फोन आल्याने सगळीकडे खळबळ

राज्यभरात मागील काही दिवसांपासून धमकीचे फोन येणंच सत्र सुरु आहे.

राज्यभरात मागील काही दिवसांपासून धमकीचे फोन येणंच सत्र सुरु आहे. असाच धमकीचा फोन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना आला आहे. त्यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात रात्री बॉम्ब असल्याचा सांगत एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. या आलेल्या फोनमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. त्यानंतर आव्हाड यांच्या घरी बॉम्बशोधक पथकाने येऊन तपासणी केली पण काही निष्पन्न झाले नाही. मात्र दोन दिवसांआधी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तक नगर पोलिसांकडून देण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री अणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद बंगल्यामध्ये रात्री कोणतीतरी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन एका अज्ञात व्यक्तीकडून आला होता. त्यानंतर आव्हाड यांच्या घरी बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली पण तिथे काहीच मिळाले नाही. तर दोन दिवसांआधी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला होणार असल्याची शक्यता वर्तक नगर पोलिसांनी वर्तवली होती. या संदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तींकडून मुंबईमध्ये ६ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेसेज आला होता. या मेसेजनंतर सर्व पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. या अज्ञात व्यक्तीचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत.

मुंबई, पुणे, ठाणे या मोठ्या शहरात मागील काही दिवसांपासून अनेक धमकीचे फोन येत आहेत. शनिवारी रात्री आव्हाडांचा बंगला बॉम्बने उडवून देऊ, असे फोन करून धमकी देण्यात आली होती. त्यानंतर संपूर्णशहरात सगळीकडे खळबळ उडाली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच त्याच्या बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Aaditya Thackeray PC Live : निवडणूक तोंडावर आल्यावर लोकार्पणाचे कार्यक्रम…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss