Saturday, July 27, 2024

Latest Posts

भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय, मनोज जरांगेंवर दाखल होणार गुन्हा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटीमध्ये निर्णायक बैठक बोलावली होती.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटीमध्ये निर्णायक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी मराठा बांधवाना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर जरांगेंनी एकेरी आणि खालच्या भाषेत बोलून फडणवीसांवर टीका केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. याआधी पोलिसांकडून मराठा आंदोलकानावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज पहिल्यांदा पोलिसांनी मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राज्य सरकारकडून कालपासून १०४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ४२५ गुन्हे हे मराठवाड्यात दाखल करण्यात आले आहेत. बीडमधील शिरुर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लोकांना रास्ता रोको आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये भाजपाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजप आमदारांना काही सूचना देण्यात आल्या. आपण मराठा समाजाच्या पाठीशी आहोत. ही सर्व माहिती आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा. मनोज जरांगे हे वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलत आहेत. आरक्षणाचा मुद्दा संयमाने हाताळला पाहिजे. भाजप मराठा समाजाच्या पाठीशी आहे. याआधी भाजपने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले आहे. तसेच आज झालेल्या बैठकीमध्ये भाजपने मनोज जरांगे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जरांगे राजकीय भाषा बोलत असतील तर त्यांना प्रतिउत्तर द्या, असे आमदारांना सांगण्यात आले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज त्यांचे आंतरवली सराटी मधील उपोषण स्थगित केले आहे. या उपोषणाचे रूपांतर आता साखळी उपोषणामध्ये होणार असल्याचे जरांगे म्हणाले. मनोज जरांगे पुढील एक ते दोन दिवस रुग्णालयात उपचार घेणार आहेत. त्यानंतर ते भेटीसाठी गावागावात फिरणार आहेत. मात्र या भेटी दरम्यान, मनोज जरांगे यांना पहिल्यासारखा प्रतिसाद मिळणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी चिघळू नये म्ह्णून राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीच्या तारखेवरून गोंधळ, प्रकाश आंबेडकर म्हणाले… 

हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे यांच्यात काय बोलणे झाले ते जाहीर करा- नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss