Tuesday, May 21, 2024

Latest Posts

PM Modi यांच्या हत्त्येचा कट रचला जातोय, BJP च्या ज्येष्ठ नेत्याचे खळबळजनक व्यक्तव्य

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली असून राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या जात आहेत. अश्यातच, गुहागर (Guhagar) येथील महायुतीच्या (Mahayuti) सभेत भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण (Madhukar Chavan) यांनी खळबळजनक व्यक्तव्य केले आहे. “पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) पुन्हा सत्तेत आले तर भारत जगात शक्तिशाली होईल, म्हणून त्यांच्या हत्येचा कट रचला जातोय,” असे व्यक्तव्य त्यांनी केले. यासोबतच, शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

गुहागर येथील महायुतीच्या सभेत बोलताना मधुकर चव्हाण म्हणाले, “सावध व्हा. घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवण्याचे प्रयत्न चालू आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत जगात शक्तिशाली देश बनेल याच भितीने पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात आहे. कमल हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास आहे. पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेऊन कामाला लागा. आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवाय.”

पुढे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “उद्धव ठाकरे हे लाचार आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यभर कोणासमोर झुकले नाहीत पण उद्धव ठाकरे तुम्ही औरंगजेबासमोर झुकलात. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यासमोर झुकलात.” शरद पवार यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, “शरद पवार यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. मनोज जारांगे पाटील यांच्यामागे शरद पवार यांचाच हात होता. स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्या शरद पवारांना राजा कसा असतो माहीत आहे का?” असा सवालही त्यांनी विचारला आहे. तसेच, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करत, ‘देशाचे संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरात प्रकाश आंबेडकर यांच्या रूपात काजवा जन्माला आला.’ असे म्हणाले.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss