राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. विधिमंडळ सचिवालयाने ठरवलेल्या कामकाजानुसार २६ फेब्रुवारी म्हणजेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २०२३ ते २०२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका असे यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिनांक २७ फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहात दुपारी दोन वाजता मांडण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारी २०२४ ते १ मार्च २०२४ या कालावधीत होणार असून, एकूण पाच दिवस कामकाज चालणार आहे. अंतिम अर्थसंकल्पात १ एप्रिल २०२४ ते ३१ जुलै २०२४ या चार महिन्यातील महत्त्वाच्या खर्चाची तरतूद करण्यात येणार आहे. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, कर्जाचे हप्ते आणि व्याज यासोबतच लोकसभा निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश असणार आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रस्ताव आणि विनियोजन विधेयकाला मान्यता देण्यात येणार आहे.
“कुसुमाग्रज साहित्य जागर” या कार्यक्रमाचे संयोजन
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी दुपारी ४ ते ६ यावेळेत “कुसुमाग्रज साहित्य जागर” या कार्यक्रमाचे संयोजन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेनुसार करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
Manoj Jarange Patil यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यांची प्रतिक्रिया म्हणाले…
मला नोबेल प्राईज मिळावे असे केजरीवाल का म्हणाले?