Saturday, July 27, 2024

Latest Posts

STATE BACKWARD COMMISSION च्या अध्यक्षांनी दिला राजीनामा

राज्य मागासवर्ग आयोगाच्या राजीनाम्यांचे सत्र सध्या सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला आहे. विधानसभेमध्ये आज मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पिटीशनवर सुनावणी प्रलंबित असताना राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. क्युरीटीव्ह पिटीशनला सहाय्यभूत ठरेल असा डाटा राज्य सरकारला या मागासवर्ग आयोगाकडून अपेक्षित होता. मात्र राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांच्या मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप होत असल्याचा यासोबतच राज्य सरकारला पाहिजे तसा डाटा आयोगाने तयार करून द्यावा, पण याबाबत दबाव टाकला जात असल्याचा आरोप आयोगावर केला जात होता. राज्य मागासवर्ग आयोगाचेअध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता पुढील प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

महिनाभरात आयोगातील पाच सदस्यांनी राजीनामा दिला आहे. आयोगाच्या बालाजी सागर किल्लारीकर आणि लक्ष्मण हाके या दोन सदस्यांनी या आधीच राजीनामा दिला होता. आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनीही दबावामुळे राजीनामा दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठी हवी ती माहिती मिळवण्याचे आणि आयोगाची पूर्ण रचना करण्याचे आव्हान आता राज्य सरकार समोर असणार आहे. राज्य मागासवर्ग आयोग हा मागासवर्गातील जातीची माहिती गोळा करण्यासाठी असून राज्य मागासवर्गीय आयोग हा स्वायत्त असणारा आहे. आयोग स्वायत्त आहे पण माहिती देण्यासाठी आयोगावर सरकारकडून दबाव टाकण्यात आल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वेतून आलेल्या माहितीनुसार सरकारला अपेक्षित माहिती देणे, आम्हाला शक्य नाही. जी माहिती आमच्याकडे आहे तीच आम्ही पुरवू शकतो, असे आयोगाच्या सदस्यांनी सांगितले आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभरात तापला असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि अशात सरकारकडून आता मागासवर्गीय आयोगाला देखील मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. असे असताना राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्याचे सत्र सुरू असल्यामुळे या प्रश्नाचे पुढे काय होतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss