Saturday, July 27, 2024

Latest Posts

छगन भुजबळांचा मनोज जरांगे यांच्यावर उपरोधिक टोला

छगन भुजबळांनी सुरवातच जरांगेनं टोमना मार्ट केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या सोयऱ्यांना देखील आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी आज केली होती. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांनी मिश्किल शेरेबाजी केली आहे.

छगन भुजबळांनी सुरवातच जरांगेनं टोमना मार्ट केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या सोयऱ्यांना देखील आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी आज केली होती. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांनी मिश्किल शेरेबाजी केली आहे. “केवळ सोयऱ्यांनाच कशाला? एखाद्या व्यक्तीच्या व्याहींना, त्यांच्या व्याहींना आणि त्यांच्याही व्याहींना आपण आरक्षण देऊ. एवढंच कशाला, तर जरांगेंच्या घराजवळ मंत्र्यांचे गले आणि शासकीय कार्यालय उभारू, म्हणजे त्यांच्या मनात काही आलं की लगेच त्याबाबत निर्णय घेऊन जीआर काढता येईल.”असं भुजबळ म्हणाले आहेत. मराठा आरक्षण वरून राजकारण रोजच पाहायला मिळत आहे . या वर सतत आरोपप्रत्यारोपाची मालिका सुरु आहे.

आपण आपली मनोज जरांगे यांच्या संदर्भातील सर्व भाषणं आणि वक्तव्य मागे घेतोय आणि जरांगेंच्या मतांशी आपणही सहमत असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. जरांगे सरकारला वेठीस धरत नाहीतर, सरकारचं जरांगेंना वेठीस धरतंय, सरकारनं जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि काही मंत्र्यांना जरांगेंच्या आंदोलनस्थळी कायमस्वरुपी बंगले द्यावेत, सचिवांचं कार्यालयही तिथे उभं करावं, जेणेकरुन जरांगेंनी मागणी उच्चारली की ती तातडीनं सरकारला पूर्ण करता येईल, असं म्हणत छगन भुजबळांनी उपरोधिक टोला जरांगेंना लगावला आहे. मराठा आरक्षणा संदर्भात राज्यसरकार निकाल लावणार का हाच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, “जरांगेंचं ऐकायला पाहिजे. मंत्र्यांचे दोन-चार बंगले तिथे बांधले पाहिजेत. त्यांना रोज अभिनव कल्पना येतात, त्यांचा आदर राखला पाहिजे. देवसुद्धा त्यांना घाबरतो, सासू-सासऱ्यांचे मित्र सर्वांना दाखले द्या.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “माझी भुमिका अशी आहे की, जरांगे यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. सर्वांना आरक्षण द्यायला पाहिजे. आपण जरांगे यांचं ऐकलं पहिजे. नाहीतर मोर्चा घेऊन ते येतील. व्याह्याचे व्याही व्याह्याचे व्याही असं सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे. ते पुढे जाऊन शिक्षणाबाबत शेतकऱ्यांच्याबाबतसुद्धा केलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की, सरकारनं वाटाघाटीचा घोळ घालू नये. ते सांगतात सरकार मान्य करत आहे. मी तर जरांगे यांना सपोर्ट करतोय. सरकारनं फक्त त्यांचंच ऐकायचं, देवसुद्धा त्यांना घाबरतो.”

 

जरांगेंनी सरकारला वेठीस धरलं नाही, सरकारनं जरांगेंना वेठीस धरलंय : मंत्री छगन भुजबळ “जरांगे बोलतील आणि त्यांच्या हातात सगळं आहे. ७ ते ८ कोटी मराठा त्यांच्या हातात आहे. ताबडतोब त्या ठिकाणी एका निवृत्त न्यायाधीशांचं कार्यालय सुरू करा आणि त्या ठिकाणी लगेच माझा जामीन रद्द करून टाका. जरांगे यांनी सरकारला वेठीस धरलं नाही, सरकारनं जरांगे यांना वेठीस धरलं आहे, पुढच्या मेळाव्यात त्यांच्या बाजूनं मी भाषणं करणार आहे.

अपात्रतेच्या मुद्द्यावर जरांगेंशी बोलून पटकन निर्णय घ्यावा : मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले

या संदर्भात “मी एकदम युटर्न घेतला आहे. सध्या जी अपात्रतेची सुनावणी सूरू आहे, त्याबाबत जरांगे यांच्याशी बोलावं आणि पटकन निर्णय घेतला जावा. उपरोधिक म्हणा, हतबलता म्हणाव काय म्हणायचं आहे ते म्हणा.”, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांनी केला मोठा दावा, निवडणुका धनुष्यबाणावर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss