Saturday, July 27, 2024

Latest Posts

Time Maharashtra आयोजित Strawberry With CM कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

बक्षीस समारंभापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची मुलाखत टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांनी घेतली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला.

दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra) आयोजित स्ट्रॉबेरी विथ सीएम (Strawberry With CM) हा कार्यक्रम पाचगणी, सातारा येथील बिलिमोरिया हायस्कूल येथे पार पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांच्याकडून एका साहसी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर या बक्षीस समारंभापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची मुलाखत टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांनी घेतली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला.

या कार्यक्रमादरम्यान ऑडिटोरियममध्ये उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यावेळी चिठ्या देऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरी संदर्भातल्या समस्या लिहून घेतल्या होत्या. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एक चिट्ठी काढून शेतकऱ्याच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी स्ट्रॉबेरीला अनुदान देण्यासंदर्भात प्रश्न हा चिठ्ठी मार्फत निघाला होता. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले होते कि, यावर नक्कीच विचार हा केला जाईल. तर या स्ट्रॉबेरी विथ सीएम कार्यक्रमाला आमदार, मंत्री, स्थानिक शेतकरी, महिलावर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला होता.

पॅराग्लायडिंग ही थरारक स्पर्धा महाराष्ट्रातील ‘पॅराग्लायडिंगची पंढरी’ मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) जवळच्या पाचगणी या ठिकाणी संपन्न झाली. हा साहसी क्रीडा प्रकाराचा मेळा १२ फेब्रुवारी पासून सुरु झाला होता. तर दिनांक १८ फेब्रुवारी रोजी बक्षीस समारंभ हा पार पडला आहे. या स्पर्धेत १२ देशातील सुमारे १५० पायलट्स सभागी झाले होते. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील एका ऐतिहासिक, साहसी आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन टाईम महाराष्ट्र (Time Maharashtra), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) एमएसआरडीसी, एमआयडीसी, सारस्वत बँक आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांनी केले होते.

 हे ही वाचा:

पॅराग्लायडिंगच्या निसर्गसंपन्न पंढरीमध्ये रंगणार ‘टाइम महाराष्ट्र’चे महापॅराग्लायडिंग

‘टाइम महाराष्ट्र’ च्या प्रेक्षकांना मिळणार Free Paragliding ची संधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss