Sunday, April 28, 2024

Latest Posts

पॅराग्लायडिंगच्या निसर्गसंपन्न पंढरीमध्ये रंगणार ‘टाइम महाराष्ट्र’चे महापॅराग्लायडिंग

मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हंटल जात. मुंबईच्या मैदानावर एखाद्या खेळाडूने चमकदार कामगिरी केली की देशभरात त्याला एक लौकिक प्राप्त होतो.

मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हंटल जात. मुंबईच्या मैदानावर एखाद्या खेळाडूने चमकदार कामगिरी केली की देशभरात त्याला एक लौकिक प्राप्त होतो. अगदी तश्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) जवळच्या पाचगणीला पॅराग्लायडिंगची पंढरी म्हंटल जात. उंचच्या उंच डोंगर, खोल दऱ्या, जलाशयं अश्या निसर्गसंपन्न पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करणं जितकं आव्हानात्मक असतं तितकंच आनंददायी असतं अशी जगभरातील पॅराग्लायडर्सची भावना आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील एका ऐतिहासिक, साहसी आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांनी केलेले आहे. महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्नतेचे कोंदण असलेल्या दऱ्याखोऱ्यांनी नटलेल्या पाचगणी मध्ये या स्पर्धेचे आयोजन १२ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आलेले आहे. अत्यंत साहसी पद्धतीने आपलं राजकारण करताना सर्वसामान्यांनाही आपलंस करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या षष्ट्यब्दी पूर्तीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

पॅराग्लायडिंग (Paragliding) हा साहसी क्रीडा प्रकार असून महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात पहिल्यांदाच इतक्या भव्य स्वरूपात पॅराग्लायडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेला भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशनने मान्यता दिली असून ही स्पर्धा प्री वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणार आहे. त्यासाठी भारतासह यु के, जर्मनी, कझाकस्तान, अमेरिका,स्पेन, फ्रान्स, नेपाळ, तुर्की अश्या देशासह १५ देशांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. सुमारे १५० पायलट्स सहभागी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये देशाच्या पॅराग्लायडिंग क्षेत्रात पहिल्यांदाच लाखो रुपयांची बक्षिसे विजेत्यांना दिली जाणार आहेत. यात भारताचे सुनीत राव, विजय सोनी, अमेरिकेचे सुबीर असे जागतिक पातळीवर नावाजलेले पायलट्स सहभागी होणार आहेत. तर या स्पर्धेत महिला पॅराग्लायडर्स देखील आपलं नशीब अजमावणार आहेत.

पाचगणीतील टेबल लॅन्ड वरून सुरु होणाऱ्या या स्पर्धेचे उदघाटन दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गृहराज्य मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे. १२ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सकाळी १० वाजल्या पासून ते संध्याकळी ८ वाजेपर्यंत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महा पॅराग्लायडिंग महोत्सवात रोज राज्यातील मोठे नेते, चित्रपट कलाकार, प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. या टेबल लॅन्ड परिसरात आठवडाभर संध्याकाळच्या सत्रात मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांचे कलाविष्कार पहायला मिळणार आहेत. यामध्ये आघाडीचे कलाकार विशाल दादलानी, नचिकेत देसाई यांच्या सह युवा कलाकार मैत्रय जोशी यांच्या बॅण्डचा समावेश असणार आहे. यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि प्रशासनातील नामवंत मान्यवर सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने या स्पर्धेला विशेष आयोजनाचा दर्जा दिला असल्याने या स्पर्धेतील कामगिरीवर जागतिक पॅराग्लायडिंग सहभाग निश्चित होण्यासाठी पायलट्सला मदत होणार आहे. या महापॅराग्लायडिंग साठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सिडको यांचे विशेष साहाय्य लाभलेले आहे. सध्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथील वातावरण खूपच आल्हादायक आहे. त्यामुळे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी केली आहे. अश्या पर्यटकांना जगभरातल्या पॅराग्लायडर्सची विहंगम आकाश भ्रमंती पाहायला मिळणार आहे.

तसेच या स्पर्धेनिमित्त आम्ही ‘टाईम महाराष्ट्र’ च्या प्रेक्षकांसाठी खास सुवर्णसंधी घेऊन आलो आहोत. ‘टाइम महाराष्ट्र’ च्या प्रेक्षकांना मिळणार Free Paragliding ची संधी

हे ही वाचा:

रजनीकांतचा जबरदस्त अँक्शन असलेल्या ‘लाल सलाम’चा ट्रेलर प्रदर्शित अनाथ मुलांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम – Aditi Tatkare

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss