Friday, April 19, 2024

Latest Posts

‘टाइम महाराष्ट्र’ च्या प्रेक्षकांना मिळणार Free Paragliding ची संधी

आजपर्यंत तुम्ही अनेक वेळा नशीबवान प्रेक्षक बनून क्रीडा स्पर्धांचा आनंद घेतला असेल. कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत तर कधी फुटबॅालच्या मुकाबल्यात.

आजपर्यंत तुम्ही अनेक वेळा नशीबवान प्रेक्षक बनून क्रीडा स्पर्धांचा आनंद घेतला असेल. कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत तर कधी फुटबॅालच्या मुकाबल्यात. मात्र, पहिल्यांदाच तुम्हाला एका साहसी क्रीडा प्रकारामध्ये दिल थामके अंदाजात सहभागी होता येणार आहे. आणि तेही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूंसोबत. अर्थात त्यासाठी पाचगणी सारख्या निसर्ग पर्यटन स्थळापर्यंत जावं लागणार आहे. आणि त्याही आधी तुम्हाला हा आयुष्यातील अद्भुत आनंद घेण्यासाठी ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra) या न्यूज पोर्टलला Follow and Subscribe करावं लागणार आहे.

पॅराग्लायडिंगबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी या बातमीवर क्लिक करा :- पॅराग्लायडिंगच्या निसर्गसंपन्न पंढरीमध्ये रंगणार ‘टाइम महाराष्ट्र’चे महापॅराग्लायडिंग   

महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील एका ऐतिहासिक, साहसी आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांनी केलेले आहे. महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्नतेचे कोंदण असलेल्या दऱ्याखोऱ्यांनी नटलेल्या पाचगणी मध्ये या स्पर्धेचे आयोजन १२ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आलेले आहे. पॅराग्लायडिंग (Paragliding) हा साहसी क्रीडा प्रकार असून महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात पहिल्यांदाच इतक्या भव्य स्वरूपात अश्या पॅराग्लायडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. पॅराग्लायडिंग करताना एरवी आपलाच असलेला भूभाग, जलाशये, डोंगर – दऱ्या देवालय यांचं विहंगम दृश्य आपल्याला अनुभवता येत. महाबळेश्वर जवळच्या पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करणं म्हणजे स्वर्गीय सुख अनुभवण्यासारखं आहे. ‘टाईम महाराष्ट्र’ आणि एमटीडीसीने आयोजित केलेल्या या साहसी क्रीडा प्रकारचा आनंद घेताना तुम्हाला आंतराष्ट्रीय पातळीवरच्या प्रशिक्षकांची आणि तंत्रज्ञांची साथ सोबत मिळणार आहे. या साठी तुम्ही १८ वर्षाचे असणं आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या या पॅराग्लायडिंग स्पर्धेमध्ये आपण एरवी दुर्मिळ असलेला हा अनुभव आपल्या आयुष्यात साठवू शकता.

तुम्हाला देखील पॅराग्लायडिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर पुढील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
  • सर्वात आधी तुमच्या मोबाईल वरून टाईम महाराष्ट्र हा You Tube Channel, त्याच बरोबर Facebook Page आणि Instagram Account ला Follow and Subscribe करा

या आमच्या चॅनेलच्या लिंक आहेत.

Youtube – https://www.youtube.com/@TimeMaharashtra

Facebook – https://www.facebook.com/timemaharashtra

Instagram – https://www.instagram.com/timemaharashtra

  • या तिन्ही प्लॅटफॉर्मवर तुम्ही Follow and Subscribe केल्यानंतर आम्हाला आमच्या व्हाट्सअँप नंबर वर त्याचे Screen Shots पाठवणे अनिवार्य आहे.
  • Whatsapp No – 97696 12336 (तसेच तुमचे नाव, पत्ता, वय, आणि मोबाईल नंबर पाठवा)

तसेच या मधून आम्ही ०९ प्रेक्षकांची निवड करून टाईम महाराष्ट्र तर्फे विनामूल्य पॅराग्लायडिंग करण्याची संधी देणार आहोत.

याबाबतच्या सूचना आमच्या चॅनेलवरच तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. त्यासाठी आपल्याला कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधण्याची किंवा आमच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याची गरज पडणार नाही. तुमच्यातल्या नशीबवान प्रेक्षकांची प्रतीक्षा आम्ही पाचगणीच्या टेबललॅन्डवर नक्की करणार आहोत.

हे ही वाचा:

भिजवलेले अंजीर खाल्ल्याने शरीराला होतात आरोग्यदायी फायदे Mumbai Congress पक्षात राजकीय भूकंप, अजून एका नेत्याचा राजीनामा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss