Saturday, March 2, 2024

Latest Posts

राज्यभरात थंडीची लाट, पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता

राज्यभरात सगळीकडे थंडी वाढली आहे.

राज्यभरात सगळीकडे थंडी वाढली आहे. एकीकडे दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे तर दुसरीकडे उत्तर भारतामध्ये थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. तापमानात घट झाल्यामुळे राज्यभरात थंडी वाढली आहे. राज्यभरात गारठा वाढल्यामुळे लोक शेकोटीचा आधार घेत आहेत. पुढील काही दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, २५ डिसेंबरनंतर तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.त्यानंतर पुन्हा एकदा डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे. थंडी वाढल्यामुळे सगळीकडे धुक्यांची चादर पसरली आहे.

जळगावमध्ये तापमानात घट झाल्यामुळे सगळीकडे थंडी वाढली आहे. राज्यात पुढील आठवडा कोरडे वातावरण असल्यामुळे हवेत गारवा जाणवेल. जळगावमधील तापमान १० अंशपेक्षा खाली आले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. थंडीपासून वाचण्यासाठी अनेक नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला आहे. जळगावमध्ये गुळाचा चहा, मिरची भजे आणि झणझणीत मिसळ खाण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंढरपूरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी कडाक्याची थंडी पडू लागल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक आजारी पडत आहे. काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर आता थंडी वाढू लागली आहे. अनेक भागात दाट धुक्यांची चादर पसरली आहे. सकाळी पडत असलेल्या दाट धुक्यांमुळे रस्ते , शेती दिसत नसल्याचे चित्र आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण, थंडी आणि त्यातच आता धुक्याची चादर पसरली आहे. या बदलेल्या वातावरणाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. दाट धुक्यांची चादर पसरल्यामुळे २०० किलोमीटर पर्यंतचा रस्ता दिसत नाही. याचा फटका शाळकरी मुले, भाजीपाला, दूधवाले यांना बसला आहे.

हे ही वाचा:

THANE: भिवंडीतील अपघातात दोघांचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

MAHARASHTRA: कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार, AJIT PAWAR यांची ग्वाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss