पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजस्थानमधील बांसवाडा येथे केलेल्या प्रचारसभेत काँग्रेस (Congress) आणि मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या सभेत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संपूर्ण देशातून त्यांच्यावर टीका होत आहे. विरोधी पक्षांनी तर हा मुद्दा उचलून धरत निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार दाखल करण्यात येणार आहे. यावर आता, नागपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नैश नुसरत अली (Nash Nusrat Ali) यांनी जोरदार प्रत्त्युत्तर देत, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहा भावंडं आहेत त्यामुळे जास्त मुले जन्माला घालण्यासंदर्भात त्यांनी मुस्लिमांवर टीका करू नये,” असे वक्तव्य केले. तसेच, यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बांसवाडा येथे प्रचारसभेत काँग्रेसवर टीका करताना मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावेळी ते म्हणाले, “काँग्रेसचा जाहीरनामा हा माओवादाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस आता डाव्यांच्या जाळात अडकली आहे. येथे आलेल्या एक मित्राने सांगितले, काँग्रेसचा जाहीरनामा बघा. काँग्रेसचं सरकार आलं तर तुमच्या मालमत्तेचं ऑडिट होईल. आई बहिणींच्या सोन्याचं, दागिन्यांचे मूल्यही मोजले जाईल. त्यांचं वातापही हे लोक करतील. देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मुस्लिमांचा आहे. असे काँग्रेसने आधीच म्हंटल आहे. तुमच्या संपत्तीवर यांचा अधिकार आहे का? हे लोक तुमच्या आय- बहिणींचे मंगळसूत्रंही अंगावर राहू देणार नाहीत. भ्रष्टाचार हाच काँग्रेसचा शिष्टाचार आहे.” यावेळी त्यांनी मुस्लिम समुदायाचा उल्लेख घुसखोर, जास्त मुले जन्माला घालणारे असा केला होता.
पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून टीकेची झोड उठली आहे. नागपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नैश नुसरत अली यांनी यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहा भावंडं आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनाही सहा-सात भावंडं आहेत. त्यामुळे, जास्त मुले असल्यासंदर्भात मुस्लिमांवर टीका करू नका. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यात हिंदूंएवढे योगदान मुस्लिमांचेही होते. मुस्लिमतर मृत्यूनंतर दफनही याच मातीत होतात., हे विसरू नका. देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचे भरभरून योगदान असतानादेखील पंतप्रधान त्यांना घुसखोर म्हणत असतील तर ते दुर्दैवी आहे. निवडणूक आयोग यासंदर्भात काही कारवाई का करत नाही, याचे आश्चर्य वाटते. लवकरच काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करेल. काँग्रेस पाक्षणे केली नाही तर मी वैयक्तिकरित्या निवडणूक आयोगाकडे तक्रार करेन,” असे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा:
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचे सदा सरवणकरांच्या मुलाला खडेबोल
Follow Us