Saturday, May 4, 2024

Latest Posts

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचे सदा सरवणकरांच्या मुलाला खडेबोल

महायुतीतील भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकदिशेने वाटचाल करत आहेत. परंतु तिन्ही पक्षांमध्ये एकी तर सोडाच पण प्रचंड वादविवाद असल्याच्या घटना वेळोवेळी समोर येत असतात. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे.

महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकदिशेने वाटचाल करत आहेत. परंतु तिन्ही पक्षांमध्ये एकी तर सोडाच पण प्रचंड वादविवाद असल्याच्या घटना वेळोवेळी समोर येत असतात. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात भाग असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे आणि भाजप गट यांमध्ये विवाद चालू आहेत. भाजपच्या माहीम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी सोशल मीडिया वर एक पोस्ट शेअर करत शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र व माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

समाधान सरवणकर शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत. समाधान सरावणकरांची बहीण प्रिया सरवणकर हिच्याशी अक्षता तेंडुलकर यांचे स्थानिक पातळीवरती विवाद आहेत. आता हे वाद आणखीनच वाढले आहेत. अक्षता तेंडुलकरांनी शेअर केलेल्या पोस्टमधून समाधान व प्रिया यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. पोस्ट मध्ये अक्षता यांनी लिहल होत, ‘हिंदुत्व आणि मोदी यांच्यासाठी आम्ही काम करतो. बापाच्या दोन नंबरच्या पैशावर आम्ही उडत नाहीत. युतीधर्म फक्त भाजप पाळणार अश्या गैरसमजात राहू नका. आमच्या नादी लागलात तर ‘आरे ला कारे’ करायला आम्हाला चांगलंच जमतं’. ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने शिवसेना भाजप मधील वाद चांगलाच वाढला आहे. यावर सदा सरवणकर यांची काय प्रतिक्रिया असेल यावर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. माहीममधल्या या वादाचा फटका शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून वाद मिटविण्याचे लवकरच प्रयत्न होतील.

२०२२ मध्ये गणेशोत्सव काळात ठाकरे गटाशी झालेल्या वादामुळे सदा सरवणकर वादाच्या घरात अडकले होते. अनंतचतुर्दशीदिवशी दादर येथे ठाकरे गटाकडून एक मंच उभारण्यात आला होता. त्यावेळी सरवणकर यांनी ‘म्याव म्याव’ असा आवाज काढत कार्यकर्त्यांना डिवचले होते. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये प्रचंड वाद झाले होते. हे प्रकरण चांगलेच चिघळले होते.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss