Saturday, May 4, 2024

Latest Posts

MNS नेत्या Shalini Thackeray यांचा Mahayuti ला घरचा आहेर, BJP च्या ‘या’ उमेदवारांना मनसेचा पाठिंबा नाही

आता मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल करत महायुतीला घरचा आहेर दिला आहे. मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवरून जोरदार आगपाखड केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ‘बिनशर्त पाठिंबा’ देत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन पाठिंबा देण्याचे आदेशही दिली होते. त्यानंतर, मनसैनिकांनी महायुतीच्या प्रचारात सामील होत त्यांना पाठिंबा दिला होता. परंतु, आता मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल करत महायुतीला घरचा आहेर दिला आहे.

मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून जोरदार आगपाखड केली आहे. त्या म्हणाल्या, “मनसेला ‘धनुष्य बाण’ चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम (Sanjay Nirupam) आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर (Ravindra Waykar) सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये.”

शालिनी ठाकरे यांच्या पोस्टमुळे राजकीय वातावरणात चर्चा रंगू लागल्या आहेत. एकीकडे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महायुतीला पाठिंबा देण्याच्या केलेल्या आवाहनामुळे अनेक मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही पदाधिकाऱ्यांनी तर मोठे पाऊल उचलत थेट आपला राजीनामा सुपूर्द केला होता. त्यात आता शालिनी ठाकरे यांनी भाजपलाच घरचा आहेर दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना उबाठा पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या रवींद्र वायकर आणि काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या संजय निरुपम यांच्यासाठी प्रचारात सभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे राहणे औत्सुक्याचे ठरेल.

हे ही वाचा:

Voting करण्यासाठी ‘या’ दिवसापर्यंत Registration करता येणार

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांना सोयीसुविधा पुरवा – Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss