Friday, May 3, 2024

Latest Posts

सत्ताबदलाच्या अंदाजामुळेच Elon Musk यांचा भारत दौरा लांबणीवर, Congress प्रवक्त्याचे वक्तव्य

काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी मोठे वक्तव्य करत, "सत्ताबदलाच्या अंदाजामुळेच टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी आपला भारत दौरा लांबणीवर टाकला," असे वक्तव्य केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) धामधुमीला देशभरात उत्साहाने सुरुवात झाली आहे. शुक्रवारी, (१९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून १ जुणाऱ्यांत उर्वरित सहा टप्पे पार पडणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करताच असतात. आता काँग्रेसचे (Congress) माजी आमदार आणि प्रवक्ते अनंत गाडगीळ (Anant Gadgil) यांनी मोठे वक्तव्य करत, “सत्ताबदलाच्या अंदाजामुळेच टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी आपला भारत दौरा लांबणीवर टाकला,” असे वक्तव्य केले आहे.

यावेळी गाडगीळ म्हणाले, “जगातील एक बडे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे (Tesla) प्रमुख एलन मस्क (Elon Musk) यांनी आपला नियोजीत भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहे म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे याचा अंदाज आल्यामुळेच एलन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला आहे. फक्त देशातल्या जनतेलाच नाही तर जगभरातल्या लोकांना नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा येऊ शकत नाहीत हे कळून चुकले आहे.”

यासंदर्भात बोलताना गाडगीळ पुढे म्हणाले की, “दुसऱ्या एखाद्या देशात मोठी आर्थिक गुंतवणूक करण्या-या आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करण्यापूर्वी त्या देशातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करतात काही कंपन्या तर सामाजिक परिस्थितीवरही लक्ष ठेवून असतात. या कंपन्यांच्या प्रमुखांच्या दौ-यांचे नियोजन कित्येक महिने अगोदरच केले जात असते. संबंधीत देशात सत्तेवर कोणते सरकार असणार हा ही एक कंपन्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असतो. असे असताना टेस्ला या प्रसिध्द कंपनीचे मालक एलन मस्क यांनी भारत दौरा आता लांबणीवर टाकला आहे याचाच अर्थ भारतात निवडणूकांनतर सत्तापरिवर्तन होणार आहे याचा त्यांना अंदाज आला आहे. देशातल्या जनतेलाही हा अंदाज आलेला आहे. कितीही ४०० पारच्या गप्पा मारल्या तरी नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. मोदी आणि भाजपचा पराभव निश्चित झालेला आहे,” असे गाडगीळ म्हणाले.

हे ही वाचा:

Eknath Shinde यांचा मोठा गौप्यस्फोट; Uddhav Thackeray, Aaditya Thackeray यांच्याबाबत केला खळबळजनक दावा

वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत, Eknath Shinde यांचा Uddhav Thackeray यांच्यावर घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss