Friday, April 19, 2024

Latest Posts

उल्हासनगर प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर, केली मोठी घोषणा

गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. आणि मोठी घोषणा केली आहे.

कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. काल रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शिंदे गटाचे (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या प्रकरणावरून आता सर्वत्र प्रतिक्रिया उमट आहेत. नुकतसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया दिली होती. तर आता गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. आणि मोठी घोषणा केली आहे.

आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येईल, असा निर्णय गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आज दुपारी आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलीस किती दिवस कठोडी मागणार? हे पाहावे लागणार आहे.

या प्रकरणात भाजप आमदारा गणपत गायकवाड सह, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. गणपत गायकवाडांसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे मात्र आणखी तिघे अद्याप फरार आहेत. आरोपी नागेश बाडेकर, वैभव गायकवाड आणि विकी गणित्रा या फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आज या सर्वांना कोर्टात हजार करण्यात येणार आहे.

तर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाडसह दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्या गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. गोळ्या काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. राहुल पाटील यांच्या शरीरातूनही २ गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss