महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आज खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanaraje Bhosale) यांच्या सातारामधील जलमंदिर पॅलेस निवासस्थानी भेट देण्यासाठी गेले होते. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भवानीमाता मंदिरात महापूजा करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जलमंदिर पॅलेस निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सातारामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केले जाते.
आज सगळीकडे आनंदाचा दिवस आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कायमच उत्साहात असतात. दिलखुलास, मोकळ्या मनाचा माणूस म्हणून राजेंची ओळख आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज आनंदाचा दिवस आहे. उदयनराजे याचा आज वाढदिवस आहे. तसे उदयनराजे कायम उत्साहात असतात. तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. राज्यसभेवर देखील गेले. उदयनराजेंकडून अनेक विकासाची कामे झाली. दिलखुलास, मोकळ्या मनाचा माणूस म्हणून राजेंची ओळख आहे. आज राज्याचा कारभार छत्रपतीना डोळ्यासमोर ठेऊन करत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये राजे अग्रभागी होते. आरक्षण देण्याची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण केली. काहीजण म्हणतात आरक्षण टिकणार नाही, पण ते का टिकणार नाही हे कुणी सांगत नाही. ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी काहींनी आरक्षण दिले नाही, असे म्हणत मराठा आरक्षणावरून टीका करणाऱ्या शिंदेनी प्रतिउत्तर दिले आहे.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांचा वाढदिवस म्हणजे सातारा जिल्ह्याला पर्वणी आहे. त्यांच्या वाढदिवसादिवशी सगळीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मागील चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यात सगळीकडे वाढदिवसानिमित्त लगबग सुरु आहे. उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस म्हणजे सगळीकडे आनंदाचा दिवस आहे.
हे ही वाचा:
तुमच्या स्तनात देखील सूज येते, वेदना होतात? तर चुकूनही करू नका दुर्लक्ष…
निवडणूकीचे काम सोपे करून जबाबदारपणा वाढवणारा मतदार संपर्क ॲप – Devendra Fadnavis