मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा करत आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान त्यांनी अनके ठिकाणी सभा घेतल्या आहेत. त्यांच्या या सभेला मराठा बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र मनोज जरांगे यांची धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील एका सभेत भाषण चालू असताना त्यांची अचानक ताब्यात बिघडली. तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी त्यांचे भाषण थोडक्यात उरकले. दरम्यान, तत्काळ डॉक्टरांनी जरांगे यांची तपासणी करून त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. पण मनोज जरांगे हे आपल्या दौऱ्यावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे.
मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांची लोहारा तालुक्यातील माकणी-करजगाव येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला जात असताना त्यांची तब्येत बिघडली. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने सभा रद्द करण्याची काहींनी त्यांना विनंती केली पण ते सभेला उपस्थित राहणार हे ठाम होते. दुपारी सव्वाबारा वाजल्यानंतर मनोज जरांगे हे सभेच्या ठिकाणी पोहचले. दरम्यान भाषण सुरु असताना त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना उभं राहणं देखील शक्य नव्हते. त्यामुळे जरांगे यांनी बसून भाषण केले. डॉक्टरानी जरांगेंची तपासणी करून त्यांना आरामाचा सल्ला दिला. जरांगे यांनी पुढेल दौरा करायचा असून, मला थांबता येणार नाही असे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आरक्षणाच्या लढाईत जीव गेला तरीही चालेल. आता ही लढाई अंतिम टप्यात आली असून, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभरही मागे हटणार नाही, असे जरांगे उपस्थितांना म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांची संध्याकाळी बीडमध्ये सभा होणार आहे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा या ठिकाणी त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वाघाळा येथील बैलगाडी मैदानावर सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून मनोज जरांगे हे मराठा बांधवाना संबोधित करणार आहेत. त्यांच्या सभेच्या ठिकाणी किल्ल्याच्या तटबंदीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तसेच सभेच्या सभेच्या ठिकाणी महापुरुषांचे मोठमोठे फ्लेक्स देखील लावण्यात आले आहेत. अंबाजोगाई येथे होत असलेल्या या सभेसाठी सर्व समाजातील लोकांनी सहकार्य केले असल्याची माहिती मराठा बांधवांनी दिली आहे.
हे ही वाचा:
POLITICS: शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढतोय, JAYANT PATIL विधानसभेत झाले व्यक्त
लसणीचे भाव गगनाला भिडले, तब्बल ४०० रुपये किलो लसूण