Tuesday, February 27, 2024

Latest Posts

लसणीचे भाव गगनाला भिडले, तब्बल ४०० रुपये किलो लसूण

अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींना आपण आपल्या जीवनातील अविभाज्य घटक मानतो.

अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींना आपण आपल्या जीवनातील अविभाज्य घटक मानतो. या पैकी एक महत्वाचा घटक म्हणजे अन्नामध्ये कांदा आणि लसूण तितकेच महत्वाचे आहे. कांदा किंवा लसूण खाद्यपदार्थमध्ये नसल्याने अनेकांच्या जीभेला चव लागत नाही. जेवणात प्रामुख्याने लसूणच्या वापर केला जातो. प्रत्येक घराघरात, हॉटेलमध्ये कांदा आणि लसूण हा जेवणात वापरलाच जातो. त्यामुळे बाजारात कांदा आणि लसूणला मोठी मागणी आहे. पण सध्या लसणीचे भाव गगनाला भिडले आहेत. कांद्यानंतर आता लसणीच्या दरात भाव वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक, महिला वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे.

कांद्या पाठोपाठ आता लसणीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांवर मोठ्या प्रमाणावर बसला आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली आहे. पिकांच्या खराब उत्पादनामुळे लसणीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून लसणीचे दर २०० ते २५० रुपये पर्यंत होते. पण आता लसणीच्या दर ३५० ते ४०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. दादर बाजार पेठेमध्ये लसणीचे दर वाढल्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. अनेक हॉटेल आणि घरांमध्ये लसणाची चटणी आणि लसणाचे पदार्थ मेनूमधून काढून टाकण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन लसूण बाजारात येईपर्यंत लसणीचे भाव वाढतेच राहणार आहेत.

दादर मार्केट पाठोपाठ नवी मुंबई बाजारात लसणीच्या दरात वाढ झाली आहे. लसणीची आवक घटल्यामुळे बाजारात लसणीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बाजारात लसणीची आवक झाली आहे. तसेच शेती उत्पादन कमी असल्यामुळे लसणीच्या भावात वाढ होत आहे. या आठवड्यात लसणीच्या भावात आणखीन वाढ झाली आहे. घाऊक बाजारात चांगल्या दर्जाचा लसूण ३५० रुपये किलोपर्यंत गेला आहे. तर किरकोळ बाजारात लसणीचा भाव ४०० ते ४१० रुपये इतका आहे. गेल्या महिन्यांत किलोमागे लसणीचे दर १२० ते १४० किलो असे होते. पण हाच दर आता ४०० रुपये किलोवर पोहचला आहे.

हे ही वाचा:

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत लगीनसराई,हळदीला दादुसची हजेरी

POLITICS: मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल कधी करणार?, VARSHA GAIKWAD यांचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss