Friday, April 19, 2024

Latest Posts

Jayant Patil यांच्या इस्लामपूरात उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची एन्ट्री

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे ५ फेब्रुवारीच्या दुपारपासून सांगली (Sangali) दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहिला कार्यक्रम जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या इस्लामपूर शहरांमध्ये असणार आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इस्लामपूर (Islampur) कार्यालयाचे आज अजित पवार(Ajit Pawar) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याबाबत, जयंत पाटील (Jayant Patil) यांना विचारले असता, ‘त्यांचे स्वागत आहे’, असे प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी (NCP) मधील फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यातील संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळत आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या गटाचे सांगली (Sangali) जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, नगरसेवक आज अजित पवार गटाची वाढ करताना दिसत आहेत. यातच, आता इस्लामपूर (Islampur) मध्येच अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या राष्ट्रवादी (NCP) कार्यालयाचे उद्घाटन करून जयंत पाटील (Jayant Patil) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आव्हान द्यायला अजित पवार गटाने सुरुवात केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा:

बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण?, Sanjay Raut यांचा सवाल

हे कृत्य म्हणजे चोरी नाही तर शासनावर टाकलेला डाका – Girish Mahajan

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss