Tuesday, April 16, 2024

Latest Posts

हे कृत्य म्हणजे चोरी नाही तर शासनावर टाकलेला डाका – Girish Mahajan

एकनाथ खडसे यांना अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणामुळे १३७ कोटी रुपयांचा दंडा करण्यात आला आहे. त्यांनी केलेले हे कृत्य म्हणजे चोरी नाही तर शासनावर टाकलेला डाका असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.  भोसरी प्रकरणात त्यांना दंड करण्यात आला होता, ही रक्कम त्यांना भरावीच लागणार आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्या सर्व मालमत्ता शासनाने ताब्यात घेतल्याचे आपण वर्तमानपत्रात वाचले असल्याचे देखील गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. यासोबतच, येत्या काही दिवसांमध्ये खडसेंनी हा दंड मुदतीमध्ये भरला नाही तर त्यांच्या संपूर्ण मालमत्तेचा लिलाव केला जाईल असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

सत्ता असली की आपलं कोणी वाकडं करू शकत नाही आणि सत्ता गेली की काय होते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी या गोष्टी केल्या असल्या तरी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन नालायक कसा आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. खडसेंच्या या कृत्यामुळे त्यांचा जावई जेलमध्ये जाऊन आला. स्वार्थ कुठे नेऊन ठेवतो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. एकनाथ खडसे नेहमी इतरांच्या भ्रष्टाचारसंदर्भात बोलतात मात्र, खडसे स्वतः भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत, आता त्यांना ते भोगावे लागत असल्याची टीका गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे जमीन घेतली, त्यातून मुरूम उत्खनन केले. मात्र, त्यांनी रॉयल्टी भरली नव्हती. कोट्यावधी रुपयांचा मुरूम विकला सर्व पैसा त्यांनी काळ्या मार्गाने घेतला. त्यासोबतच, त्यांनी याबाबत रॉयल्टी भरली असल्याचा एकही पुरावा त्यांनी दिला नाही. म्हणून, त्यांना १३७ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. याबाबत, हायकोर्टाने त्यांना फटकारले असून त्यांना ३५ कोटी रुपयांचा दंड तातडीने त्यांना भरावा लागणार आहे. मात्र, जर त्यांनी तो भरला नाही तर सगळी मालमत्ता शासनाने ताब्यात घेतल्याचे आपण वर्तमानपत्रात वाचले आहे. येत्या काही दिवसात त्यांनी हा दंड मुदतीमध्ये भरला नाही त्यांच्या संपूर्ण मालमत्तेचा लिलाव केला जाण्याची शक्यता गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

हे ही वाचा:

गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Aaditya Thackeray PC Live : निवडणूक तोंडावर आल्यावर लोकार्पणाचे कार्यक्रम…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss