Thursday, May 9, 2024

Latest Posts

Exclusive Arjun Dangale: संविधान, दलित आणि हिंदुराष्ट्र यांच्यावर अर्जुन डांगळे यांची मोठी प्रतिक्रिया

अर्जुन डांगळे यांना संविधानात बदल करून आरक्षण संपवण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा मागचा उद्देश काय असू शकतो? असा प्रश्न विचारला गेला यावर, 'सनातन धर्मामध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक,भटकेविमुक्त यांना किती स्थान आहे? शिक्षण स्वावलंबन सारखी कमजोर वर्गाची हत्यारे काढून घेतली जात आहे.

ज्येष्ठ दलित नेते आणि साहित्यिक अर्जुन डांगळे (Arjun Dangale) यांच्याशी टाइम महाराष्ट्रचे (Time Mahrashtra) संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांनी संवाद साधला ‘संविधान, डॉ. आंबेडकर, मोदी आणि त्यांची या सगळ्याकडे बघण्याची दृष्टी’ असा काही मुलाखतीचा विषय होता.

संविधानात बदल करून आरक्षण संपवण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा मागचा उद्देश काय असू शकतो? असा प्रश्न अर्जुन डांगळे यांना विचारला गेला यावर, “सनातन धर्मामध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, भटकेविमुक्त यांना किती स्थान आहे? शिक्षण स्वावलंबन सारखी कमजोर वर्गाची हत्यारे काढून घेतली जात आहे. पाठयपुस्तक बदलल्यासारखे संविधान बदलणार नाही. पण मूल्यांच्या ऱ्हासासारख्या गोष्टी घडू शकतात. संविधानात असणारी भारतीयत्वाची कल्पना नष्ट करायची आहे. हिंदू राष्ट्र बनेल कि नाही माहित नाही पण त्या दृष्टीने संबंध समाजव्यवस्था, राजकिय व्यवस्था राबवणे हा त्यांचा अजेंडा आहे. ते तर जाहीर बोलले आहेत कि संविधान बदलण्यासाठी ४०० च्या वरती खासदार निवडून आणा. ते लपवत नाहीयेत. संपूर्ण देशामध्ये धर्माच्या नावावर विष पेरून भारतीयत्व नष्ट करायचं आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संविधान बदलून दलितांचं किंवा मागासवर्गीयांचा आरक्षण काढून घेण्याचा जर कट असेल तर हा कट उजळण्याची शक्यता ही तुम्हाला मागासवर्गीय मतांमध्ये किती दिसते ? असा प्रश्न विचारला गेला असता अर्जुन डांगळे म्हणाले, “संविधान बदलणं हे मागासवर्गीय लोकांपुरते नाहीये. महात्मा गांधींनी सांगितलं होत मला हिंदू राष्ट्र नकोय. बाबासाहेबांनी धर्म न पाहता प्रत्येकाला धर्माचं स्वातंत्र्य दिलय. पण धर्माला हत्यार बनवून त्याच्या मार्फत विष पेरून संपूर्ण भारतीयत्व नष्ट करता. हे संपूर्ण देशाला घातक आहे. ज्यावेळी लोकशाही संपते तेव्हा देशाचा विकास होत नाही स्थैर्य नष्ट होत. लोकांच्या मनात मानसिक भय निर्माण केल्याने देशाची प्रगती होत नाही. लोकशाहीचा खात्मा होतो. संविधानाला धोका आहे देशाला आणि लोकशाहीला धोका आहे. संविधानातील मूल्य बदलनाच्या प्रयत्नाने ते आपल्या अजेंडा कडे वाटचाल करत आहेत.”

हे ही वाचा:

Sangali मध्ये BJP ला मोठा धक्का, चार नगरसेवकांनी दिला Vishal Patil यांना पाठिंबा

Milind Narvekar ठाण्यातून लढणार, ठाकरेंना सोडणार? CM Shinde काय करणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss