Saturday, July 27, 2024

Latest Posts

EXCLUSIVE : शेतकरी हा अन्नदाता, बळीराजा, मायबाप आहे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा जिह्ल्यातील महाबळेश्वरजवळ असलेल्या पाचगणीमध्ये टाईम महाराष्ट्र , महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन त्यांच्या तर्फे पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सातारा जिह्ल्यातील महाबळेश्वरजवळ असलेल्या पाचगणीमध्ये टाईम महाराष्ट्र , महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन त्यांच्या तर्फे पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. भारतासह वेगवेगळ्या देशातील सुमारे १५० पायलट या स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १८ फेब्रुवारीला पाचगणीमधील बिली मोरया शाळेच्या पटांगणावर पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि स्ट्रॉबेरी विथ सीएम हा कार्यक्रम पाचगणीमध्ये बिली मोरया शाळेच्या पटांगणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडला. स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला.बक्षीस वितरण सोहळ्याला ‘प्रोजेक्ट देव डी बँड’ चे आयोजन करण्यात आले होते. पॅराग्लायडिंग स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याआधी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली. ज्या स्ट्रॉबेरीने तुम्हाला प्रेमात पाडले त्या स्ट्रॉबेरीसाठी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला काही तरी करावं असं वाटतं का? असा प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, आता शेतकऱ्यांनी अनेक सूचना दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यांना अनुदान देणार. या सर्व मुद्द्यांवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत सविस्तर चर्चा करू. पण सगळ्यात शेवटी हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. आपलं सरकार शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी, गारपीटच्या वेळेस सगळ्यांना नुकसान भरपाई देतं. सतत पडणाऱ्या पावसाचे नुकसान धरले जात नव्हते पण ते सुद्धा धरले जात आहे. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जात आहेत.त्यातच आपल्या सरकारने अजून ६ हजार शेतकऱ्यांसाठी ऍड केले. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये दिले जाणार आहेत. पीक विम्यामध्ये शेतकरी १ रुपये भरणार बाकी पैसे आपले सरकार देणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. शेवटी शेतकरी हा अन्नदाता, बळीराजा, मायबाप आहे त्यामुळे त्याच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही करू, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पॅराग्लायडिंग स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमावेळी एकनाथ शिंदेनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत संवाद साधला. या कार्यक्रमाला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन, जीवन गलांडे, कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आणि महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडला.

हे ही वाचा: 

EXCLUSIVE :मी स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो- एकनाथ शिंदे

विद्या बालनने फेक इन्स्टाग्राम अकांऊटबाबत पोलिसात केली FIR दाखल,नेमकं घडलं काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss