Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Exclusive Interview of Arvind Sawant: PM Modi यांना माणुसकीचा कोपरा जरा कमीच, ते कधीच…

शिवसेनेचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्याशी टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांनी संवाद साधला. संवादादरम्यान त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या हे आजच्या लेखात जाणून घेऊया. अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) या दोघांबरोबर ही काम केले आहे. मोदी (Modi) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकमेकांचा ‘बडा भाई’ आणि ‘छोटा भाई’ असा उल्लेख करतात. अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना या दोघांबद्दल काय वाटते असा सवाल विचारल्यानंतर अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अतिशय संवेदशील आहेत, वेळप्रसंगी कणखर देखील आहेत. नरेंद्र मोदी (Narendra Modi) अगदीच राजकीय आहेत त्यांना सामाजिक भान, माणुसकीचा कोपरा जरा कमी आहे. मोदीजी हे कमी संवाद करणारे आहेत. अगदी मोकळेपणाने ते बोलत नाहीत.

मणिपूरबद्दल त्यांचं वागणं तुम्ही पाहिलंच असेल. किसान आंदोलनासाठी मी त्यांना विनंती केली होती की, प्रधानमंत्री तुम्ही स्वतः जा त्या ठिकाणी. तुम्ही गेलेलं पाहून लोकांना बरं वाटेल पण ते गेले नाहीत. ७०० शेतकरी मेले पण त्यांच्या डोळ्यात पाण्याचा थेंब ही आला नाही. यानंतर मोदीजींना खरोखरच भावना आहेत की नाही असा प्रश्न उभा राहत असल्याचे अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले. अरविंद सावंत यांना तुमचे १८ खासदार होते, संसदेमध्ये त्यातले १२ एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निघून गेले. मग तेव्हा उद्धव ठाकरेंशी संवाद होता कि नव्हता? यावर अरविंद सावंत म्हणाले,’ संवाद होता पण लोक प्रलोभानं निघून गेली. मांडलिकांनी मला असा केल्याच कारण पक्षाबद्दल एवढं प्रेम नव्हतं असं सांगितलं पण त्यांना असा सांगण्यात आलं होत की माझं नाव आहे त्याच्यावर म्हणू त्यांनी सही केली. १२ खासदारांनी सोडून गेल्यानंतर त्यांच्या पात्रांवर किती निधी दिला आहे हे एकदा पहा. १५०-२०० कोटी रुपये वाटण्यात आले आहेत’. असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

हे ही वाचा:

अयोध्येनंतर महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बिग बींनी खरेदी केली प्रॉपर्टी

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss