Saturday, July 27, 2024

Latest Posts

देशातील ‘या’ दोन दिवसांत मुसळधार पावसाचे थैमान

देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत.

देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कुठे गारठा वाढला आहे तर कुठे पाऊस पडत आहे. मागील २४ तासात तामिळनाडूतील (Tamil Nadu) काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडत आहे. यामध्ये यामध्ये दक्षिण तामिळनाडूमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळत आहेत. दक्षिण तामिळनाडूच्या थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यात मागील २४ तासांत ४०० ते ९५० मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मागील २४ तासांत कयालपट्टीणममध्ये ९४६ मिमी इतका पाऊस पडला आहे. सोबतच केरळमध्ये (Kerala) देखील पावसाने धुमशान घातला आहे.

मागील २४ तासात केरळमधील अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. आज देखील भारतीय हवामान विभागाने केरळसह तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टी (Snowfall) झाल्यानंतर मैदानी भागात थंडी वाढली आहे. राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. पहाटेपासूनच येथे धुके दिसून येते. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच, हिमाचल प्रदेशातील अनेक भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

हे ही वाचा:

MAHARASTRA: अपघातांचे सत्र सुरूच, पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

PUNE: पोलिसांनी मुलं आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ फुलवली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss