Saturday, July 27, 2024

Latest Posts

विषयावर मतभेद असतील तर मनभेद होऊ देऊ नका- Neelam Gorhe

मी काळाराम मंदिरात याआधी देखील आली आहे आणि मी रोजच प्रार्थना करते त्यामध्ये विविध ठिकाणच्या मंदिरांची प्रार्थना करते. अयोध्यातील प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामाईच्या बरोबर मी नाशिकच्या काळाराम मंदिराचे मूर्तीची मानसपूजा करत असते. २२ तारखेला राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. खूप वर्षांपासून असणारा हा विषय होता त्याला न्यायालयीन प्रक्रियेतून न्याय मिळाला. लाखो लोकांना पुढच्या काळात दर्शनासाठी सहभागी होताना पाहून आनंद वाट असल्याच्या भावना विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. स्वराज्याचे एकवचनी असल्याचं श्री प्रभू रामचंद्र हे एक प्रतीक आहेत. समाजातील प्रत्येक घटकासाठी कुटुंबासाठी वेळप्रसंगी वनवास संपादन करून त्यानंतर पुन्हा एकदा राज्य बनवून रघुवंश म्हणून पिढ्या ओळखले जातात. या दृष्टीकोनातून मी भारतीय ओळखीचा प्रतीक म्हणून प्रभू श्रीरामाकडे पाहते. राम मंदिरात प्रार्थना आणि इच्छा पूर्ण होतात असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

उल्हासनगर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाबाबत विचारले असता, हा संपूर्ण प्रश्न न्यायप्रक्रियेच्या अधीन आहे. गोळीबार झाल्यानंतर आरोपी काय बोलत असतो हे गांभीर्याने घ्यायचं नसतं, स्वतःला वाचवण्यासाठी असे आरोप केले जातात.अशा ज्या तक्रारी असतील त्या दोघांपर्यंत अंतर्गत विषय आहे. तक्रार करावी त्यात इतरांनी बोलण्याचं कारण नाही, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. राजीनामा जिवंत असतो की खिशात असतो? राजीनाम्याची बरीचशी अवस्था मला दिसत आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा विषय आहे. असे मत नीलम गोऱ्हे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत व्यक्त केले.

मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत सरकार योग्य दखल घेईल. एका समाजाच्या महिलांना आरक्षण देता येत नाही त्यांनी अजून याची माहिती करून घ्यावी.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी वारंवार स्पष्टीकरण दिले आहे की, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता प्रत्येक समाजाच्या घटकाला विद्यार्थ्यांना लाभ दिला जाईल.आयटी सेक्टरला भारतातील मोठी शक्ती म्हणून मानलं जातं. या वर्षात सगळे चित्र पलटले आहे. धार्मिक-पर्यटन उद्योगाप्रमाणे वापरले गेले तर मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. विषयावर मतभेद असतील तर मनभेद होऊ देऊ नये. आपण समाज म्हणून एक आहोत. आपण एकमेकांसाठी तोडगा काढला पाहिजे, असे आवाहन नीलम गोऱ्हे यांनी आरक्षणाच्या विषयावर केले.

हे ही वाचा:

गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Aaditya Thackeray PC Live : निवडणूक तोंडावर आल्यावर लोकार्पणाचे कार्यक्रम…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss