Saturday, July 27, 2024

Latest Posts

Aaditya Thackeray PC Live : निवडणूक तोंडावर आल्यावर लोकार्पणाचे कार्यक्रम…

Aaditya Thackeray PC Live : आज एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री येथे पत्रकार परिषद ही घेतली आहे. कोस्टल रोडच्या उद्घटनावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आज पत्रकार परिषदेत बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका ही केली आहे. कोस्टलरोड पूर्ण नाही तरीही श्रेय घेण्याचा प्रयत्न हा सुरु आहे. कोस्टल रोड हे उद्धव ठाकरे यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम होत असल्याचा कडाडून हल्लाबोल शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. कोस्टल रोडच्या पहिल्या १० किमीचे लोकार्पण पीएम मोदींकडून होत आहे. कोस्टल रोड शी काहींचा संबंध नाही, फक्त लुटालुटीचा संबंध आहे. या प्रकल्पासाठी आम्ही अनेक भेटी दिल्या. बोगद्याची सुद्धा पाहणी केली आहे. मात्र, ज्यांचा मुंबईशी काहीही सबंध नाही ते उद्घाटन करणार आहेत. डिसेंबर महिन्यात कोस्टल रोडचे काम पूर्ण व्हायला हवे होते. एमटीएचएलचे तीन महिने उद्घाटन झाले नव्हते. कोस्टल रोड पूर्ण नसतानाही उद्घाटन केले जात असल्याचा आरोपही आदित्य यांनी केला.

मुंबईच रेसकोर्स हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. या रेसकोर्स वर १००० मुंबईकर चालायला, मॉर्निंग वॉक ला योग करायला जातात. फिरायला जातात लोक, तिथे अनेक कार्यक्रम होत असतात. तसेच सामान्य नागरिकांसाठी इतकी मोठी जागा सहज उपलब्ध असणारी जागा ही रेसकोर्स आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्त्रीचे एक बिल्डर मित्र आहेत जे ४ RWITC च्या कमिटी मेंबर्स सोबत साटंलोटं करत होते पण त्यानंतर बातमी फोडल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांचं मिरिट समोर आलं. बिल्डर आहेत त्यांची बातमी फुटली. क्लब हाऊस बांधणार नाही असं ठरलं आहे. थीम पार्कऐवजी आता सेंट्रल पार्क करू असे सांगत आहेत. कोणत्या काँट्रॅक्टरसाठी भूमिगत कार पार्कि बनवत आहेत? कोणत्याही खर्चासाठी टेंडर घ्यावे लागते. मात्र, शंभर कोटी घोड्यांच्या तबेल्यासाठी वापरले जातात. सुटबुटातील लोकांच्या घोड्यांसाठी शंभर कोटी वापरले जाणार आहेत असा आरोप आदित्य यांनी केला. मुंबईकरांचे पैसे घोड्याच्या तबेल्यासाठी वापरले जाणार आहेत असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Aaditya Thackeray PC Live : निवडणूक तोंडावर आल्यावर लोकार्पणाचे कार्यक्रम…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss