Saturday, July 27, 2024

Latest Posts

बजेटमध्ये आरक्षण देता आले तर पटकन द्या – अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर मनोज जरांगेंनी दिली प्रतिक्रिया

आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget) जाहीर केला.

आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget) जाहीर केला. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, बजेटचं मला कळत नाही , ज्यांचं बजेट (Union Budget 2024) कोलमडलं ते मुंबईला (Mumbai) जाऊन काही मिळाले नाही म्हणत आहेत. बजेटमध्ये आरक्षण देता आले तर पटकन द्या, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेल्या मनोज जरांगे यांनी मांडली आहे. मनोज जरांगे अखेर आज साडे पाच महिन्यांनंतर त्यांच्या घरी जाणार आहेत. त्यावेळी मनोज जरांगे यांनी भूमिका मांडली आहे. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत.

विसंगत स्टेटमेंट करू नये, जे करायचे ते दिलखुलास पणे करायचे, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. १५ फेब्रुवारीपासून राज्याचे अधिवेशन सुरु होणार आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी १० तारखेपासून आमरण उपोषण करणार आहे. काहींचे म्हणणे आहे मुंबईत जाऊन काय मिळाले, त्यांना सर्वाना मी विनंती करतो त्यांनी अंतरवलीमध्ये यावे. जे सोशल मीडियावर लिहीत आहेत त्यांनी येऊन सांगावे, काय मिळायला हव होते, हे सांगावे, असे जरांगे म्हणाले. मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबी हे सरकारने मान्य केले आहे. अध्यादेश घेऊन आलोत, काही कसे मिळाले नाही. काहींना टोकरायची सवय आहे, गोरगरिबांच्या हाताला लागेल. ओबीसींचे न्यायालयात आव्हान देण्यात आलेय, त्यांना मागे घ्या म्हणण्यात अर्थ नाही, त्यांना आवाहन काय करणार,ओबीसीचे २७ टक्के आरक्षण चॅलेंज करणार, असे मनोज जरांगे म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केले होते. त्यांच्या उपोषणाला अखेर यश आले आहे. जरांगे आज साडे पाच महिन्यानंतर त्यांच्या घरी जाणार आहेत. मुंबईमध्ये केलेल्या उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे यांना अध्यादेश देण्यात आला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चाना उधाण आले आहे. अनेक नेत्यांनी या अध्यादेशाला विरोध केला आहे.

हे ही वाचा:

प्रतीक गांधी यांनी केली अनंत महादेवन यांच्या ‘आता वेळ झाली’ची घोषणा

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बजेटच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे घ्या जाणून…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss