Tuesday, April 23, 2024

Latest Posts

राजकीय दबाव झुकारून कायदेशीर पद्धतीने काम करण्याच्या सूचना पोलिसांना द्या- ROHIT PAWAR

पुण्यामध्ये ९ फेब्रुवारी रोजी पत्रकार निखिल वागळे (Journalist Nikhil Wagle) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.  या संपूर्ण प्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह ४३ आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणानंतर  रोहित पवार यांनी त्यांचे मत मांडत कायदेशीर पद्धतीने काम करण्याच्या सूचना पोलिसांना देण्याची मागणी पोलीस महासंचालकांकडे केली आहे. याबाबतचे, पत्रक त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे.

काय म्हणाले रोहित पवार? 

लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी हे राज्यभर #निर्भय_बनो ही मोहीम चालवत आहेत. पण यामुळं ज्यांच्या पायाखालची वाळू घसरली त्या भाजप आणि बळकावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी या तिघांवर निर्घृण हल्ला केला. ही घटना निषेधार्ह असून या तीनही मान्यवरांच्या जिवीतास धोका निर्माण झालाय. त्यामुळं त्यांना योग्य सुरक्षा पुरवण्याची आणि राजकीय दबाव झुकारून कायदेशीर पद्धतीने काम करण्याच्या सूचना पोलिसांना देण्याची मागणी पोलीस महासंचालकांकडे केली.

Image

पुण्यात निर्भय बनो (Nirbhay Bano) या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्र सेवा दलमध्ये निर्भय बनो हा कार्यक्रम ९ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला जाताना निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. निखिल वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह व्यक्त केला होता. त्यामुळे भापजचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केला.या स्थळावर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र आदेशाचे उल्लंघन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडीफोड केली, शाईफेक केली यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. यावेळी घटनास्थळावर मोठा गदारोळ झाला होता. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्याने या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून होत असलेल्या विरोध स्वीकारूनसुद्धा निखिल वागळे कार्यक्रमस्थळी पोहचले होते.

हे ही वाचा: 

करण जोहरच्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार शशांक केतकर,पोस्ट केली शेअर

अशोक चव्हाण आदर्श घोटाळा लपवण्यासाठी भाजपमध्ये गेले; उद्धव ठाकरेंनी केली चव्हाणांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss