Saturday, May 18, 2024

Latest Posts

कोल्हापूर प्रकरणावर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून कोल्हापूर शहरामध्ये मंगळवारी दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर रात्री जिल्हा प्रश्नाकडून कोल्हापूर जिल्यामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून कोल्हापूर शहरामध्ये मंगळवारी दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर रात्री जिल्हा प्रश्नाकडून कोल्हापूर जिल्यामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेटस ठेवल्या प्रकरणी झालेल्या घटनेमुळे कोल्हापूर पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यावर पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आता कोल्हापुरमधील परिस्थिती नियंत्रणामध्ये आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या संदर्भात बैठक होणार आहे. पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलेल्या गर्दीने बाहेर जाऊन गोंधळ केला या प्रकरणामध्ये अनेक जणांवर केसेस दाखल झाल्या आहेत. असे दीपक केसरकर म्हणाले.

पुढे दीपक केसरकर म्हणाल्या की, आज या केसेस मागे घ्याव्या ही मागणी करत काहीजण आले आहेत. त्यामुळे आज हा गोंधळ झाला आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी मोठा गोंधळ निर्माण झाला असून आतापर्यंत ६ जणांना अटक झाली आहे. या दगडफेक करणाऱ्यांनाही अटक झाली आहे, त्याचबरोबर प्रेत्येकाने संयम बाळगला पाहिजे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

कोल्हापूरमधील डाऊनदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकामध्ये जमले आहेत. कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. आंदोलकांनी गंजी गल्ली परिसरामध्ये दगडफेक केल्यामुळे पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला आहे. सकाळपासून कोल्हापूरमधील शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत. ४०० ते ५०० तरुण गंजी गल्लीमध्ये घुसल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. शहरामधील के एमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद आहे.

हे ही वाचा:

नवी मुंबईत घ्या Tirupati Balajiचं दर्शन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं मंदिराचं भूमिपूजन

बारावीनंतर नाही तर दहावीनंतर करता येतील हे Diploma; जाणून घ्या सविस्तर

डाळ भात खाऊन आलाय कंटाळा ? मग बनवा घरच्या घरी हॉटेल स्टाईल Dal Khichadi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss