Friday, April 26, 2024

Latest Posts

डाळ भात खाऊन आलाय कंटाळा ? मग बनवा घरच्या घरी हॉटेल स्टाईल Dal Khichadi

आपल्या भारतात डाळभात, पोळीभाजी हे पदार्थ नियमित आहारात हमखास असतात. परंतु रोज रोज तेच पदार्थ खाऊन आपल्याला प्रचंड कंटाळा येतो.

आपल्या भारतात डाळभात, पोळीभाजी हे पदार्थ नियमित आहारात हमखास असतात. परंतु रोज रोज तेच पदार्थ खाऊन आपल्याला प्रचंड कंटाळा येतो. आणि अशा वेळेस नवीन काय बनवायचे सुचत नाही. परंतु आपल्याला नवीन काही तरी खावेसे वाटते. आपल्यला वारंवार हॉटेलमध्ये जाऊन शक्य होत नाही तसेच ते आपल्या खिशाला ही परवडत नाही. आपण हॉटेल सारखे चवदार पदार्थ घरी देखील बनवू शकतो. व त्यासाठी फक्त घरगुतीच सामग्रीची आवश्यकता असते. आज आम्ही अशी एक हॉटेल स्टाईल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

दाल खिचडी हा पदार्थ चवीष्ट, उत्तम आणि खायलाही पौष्टीक असतो. परंतु हॉटेल्स मध्ये या पदार्थांची किंमत अतिशय महाग असते. डाळ खिचडीत वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो. मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण प्रचंड असते. विशेषतः या एकाच पदार्थातून तुम्हाला फायबर्स (Fibers) आणि प्रोटीन्स (Proteins) दोन्ही मिळतात. आपले शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीसुद्धा डाळ खिचडी हा एक उत्तम पदार्थ आहे. चला तर मग जाणून घेऊयात हॉटेल स्टाईल दालखिचडी घरच्या घरी कशी तयार करावी.

डाळ खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

१/२ कप तांदूळ
१/२ कप तूर डाळ
१/४ कप मूग डाळ
१/४ कप मसूर डाळ
१ चमचा तेल
१ चमचा तूप
३/४ टीस्पून मोहरी
३/४ टीस्पून जिरे
चिमूटभर हिंग
१० ते १२ कढीपत्ता पानं
२ हिरव्या मिरच्या, चिरून
१/२ टीस्पून आले, बारीक चिरून
१/२ टीस्पून लसूण, बारीक चिरून
१ आणि १/२ कांदे, बारीक चिरून
२ टोमॅटो, बारीक चिरून
आवश्यकतेनुसार पाणी

डाळ खिचडी बनवण्याची कृती –

सगळ्यात आधी एक वाटी तांदूळ, एक वाटी मसूर डाळ, एक वाटी तूर डाळ २ ते ३ तास पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर स्वच्छ पाण्यानं हे मिश्रण धुवून घ्यावे. नंतर कुकरमध्ये तूप घालून त्यात एक चमचा मोहोरी, कढीपत्ता आणि मिरची, बारीक चिरलेले लसूण, चिरलेले कांदे, टोमॅटो, मीठ, हळद, लाल तिखट हे सर्व पदार्थ घालून चांगले एकत्र करावे. फोडणी तयार झाल्यानंतर त्यात भिजवलेले डाळ, तांदूळाचे मिश्रण घालावे. व गरजेनुसार पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घावे व कुकरचं झाकण बंद करावे. कुकरचं झाकण उघडल्यानंतर त्यात चिरलेली कोथिंबीर घालावी. तसेच वरून तूप घालून गरमागरम दाल-खिचडी पापड आणि लोणच्याबरोबर सर्व्ह करावी.

Latest Posts

Don't Miss