नाशिकमधील मुंबई – आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर लूटमार केली जात आहे. या महामार्गावर गाड्यांची मोठ्या प्रमाणवर तोडफोड केली जात आहे. प्रवाशांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून किमती ऐवजाची लूटमार केली जात आहे. या लुटमारी प्रकरणी घाटी पोलिसांनी (Ghoti Police Station) गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई – आग्रा महामार्गावर लूटमार करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यातील तिसऱ्या साथीदाराला गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सध्या मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे. तौसिफ लुकमान पठाण उर्फ गफुर बस्ती, प्रविण उर्फ चाफा निंबानी काळे या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अन्वर सय्यद हा सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashikroad Central jail) दाखल आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात ०१ जानेवारीला किरण कावळे हे तीन मित्र त्यांच्या मित्रांसह रस्त्यालगत रात्रीच्या वेळी थांबले होते. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या काही संशयितांनी त्यांच्या कारची काच फोडून कोयत्याचा धाक दाखवला आहे. त्यावेळी त्यांनी सोन्याच्या चैन, मोबाईल व रोकड, असा ७० हजार ५७० रुपयांचा ऐवज चोरी केला.
असाच प्रकार नाशिकच्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नवीनकुमार जैन यांच्या गाडीच्या काचा फोडून शस्त्रांचा धाक दाखवत ८२ हजार रुपये लुटले होते. या घटनेचा गुन्हे शाखेकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासानुसार तौसिफ आणि प्रवीण दोघांना नाशिक पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नाशिक पोलिसांनी कारवाई करत आरोपीना अटक केली आहे. अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक निरीक्षक गणेश शिंदे, हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, मनोज सानप, भुषण रानडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
हे ही वाचा:
लसणीचे सेवन केल्याने शरीरासंबंधित अनेक समस्या होतात दूर, जाणून घ्या सविस्तर माहिती
छत्रपती शिवरायांची महती सांगणार ‘शिवबाचं गाणं’ प्रेक्षकांच्या भेटीला