Saturday, July 27, 2024

Latest Posts

MAHARASHTRA: पुरे झाली मन की बात, आता हवी जन की बात…AMOL KOLHE यांचे जनतेला आवाहन

शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार नाही, सरकार या मुद्द्यांवर बोलायला तयार नाही, संसदेत प्रश्न विचारण्याची सोय नाही

शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. अवकाळी पाऊस, उन्हाचा तडाखा या सर्व समस्या पार करून पूर्ण केलेली शेती आणि त्यानंतर पिकांना न मिळणारा मोबदला यामुळे शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करत आहेत. तर मागे काही शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला काढल्याची घटना सुद्धा पाहायला मिळाली होती. शेतकऱ्यांची हीच बेताची परिस्थिती सर्वांच्या नजरेत येऊन त्यावर काहीतरी तोडगा काढण्याच्या दृष्टीने दिनांक २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३ किल्ले शिवनेरी (SHIVNERI) ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (PUNE COLLECTOR OFFICE) येथे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती अमोल कोल्हे (AMOL KOLHE) यांनी दिली आहे. महाविकास आघाडीने (MAHAVIKAS AGHADI) आयोजित केलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे. याबाबतचे ट्वीट अमोल कोल्हे (AMOL KOLHE) यांनी करत या मोर्च्यामध्ये सामील होण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे? 

पुरे झाली मन की बात, आता हवी जन की बात

शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार नाही, सरकार या मुद्द्यांवर बोलायला तयार नाही, संसदेत प्रश्न विचारण्याची सोय नाही… म्हणूनच हे प्रश्न विचारण्यासाठी, शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी उभारलेल्या लढ्यात सर्वांनी सामील व्हा!

शेतकरी आक्रोश मोर्चा दिनांक २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३ किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय

या असणार आहेत प्रमुख मागण्या?

१) कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी तसेच कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे.

२) खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे.

३) बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा व्हावा.

४) पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून नुकसान भरपाई तातडीने मिळावी.

५) शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी.

६) शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित स्वरूपाचे ‘शैक्षणिक कर्ज’ धोरण लागू करावे.

या मागण्यांसाठी काढण्यात येणार असलेल्या मोर्च्यामध्ये सामील होण्यासाठी महाविकास आघाडीकडून आवाहन केले जात आहे.

हे ही वाचा:

THANE: आता एसटी महामंडळाचे तिकीट DIGITAL स्वरुपात, सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार

THANE: भिवंडीतील अपघातात दोघांचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss