Saturday, July 27, 2024

Latest Posts

MAHARASHTRA: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची मुंबईत एन्ट्री, JN. 1 किती धोकादायक आहे ?

कोरोना व्हायरस (CORONA VIRUS) ने पुन्हा एकदा सगळ्यांची चिंता वाढवली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट आता जगभरात चिंतेचा विषय बनला असून केरळमध्ये काही कोरोना रुग्ण असल्याचे समोर आले आहे. डब्ल्यूएचओ (WHO) ने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या व्हेरियंटमुळे नागरिकांना फारसा धोका नाहीये. तसेच आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये आणि त्यांची परिस्थिती पाहता जेएन १ (JN. 1) हा आरोग्यासाठी धोकादायक नसून सध्याची लस या व्हेरिएंटवर प्रभावी आहे आणि रुग्णांना त्यातून बरं होण्यासाठी मदत होऊ शकते.

१९ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे ११ नवीन रुग्ण आढळले. त्यापैकी आठ राजधानी मुंबई मधले आहेत. आतापर्यंत ३५ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यातील २७ रुग्ण हे मुंबईत सापडले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत २७  पुण्यात दोन आणि कोल्हापुरात एक रुग्ण सापडून आला आहे. दक्षिण भारतात प्रवास करून परतलेल्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. गुजरात (GUJRAT) मधील गांधीनगर येथे राहणारे दोन कोरोना महिला पॉझिटिव्ह असल्याचं कळत असताना  त्यांना  क्वारंटाईन करण्यात आले आहे. केरळमध्ये जेएन १ (JN. 1) ची लागण झालेले रुग्ण आढळून आल्यावर दक्षिण भारतातील परतणारे लोकांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे गुजरात (GUJRAT) मधील दोन महिलांचे नमुने टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही महिलांमध्ये सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दिसून आली होती.

सध्या असलेल्या कोरोनावरच्या लसी जेएन १ (JN 1) आणि कोविड-१९ विषाणूच्या इतर प्रकारांमुळे होणारे गंभीर रोग आणि मृत्यूपासून संरक्षण करण्यासाठी मदत करतात, असं युएन एजन्सीने सांगितले आहे. तसेच डब्ल्यूएचओ (WHO) ने आरोग्य कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय संबंधित सेवांमध्ये कोणत्या लोकांसाठी ॲडव्हायझरी जारी केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क  वापरणं आवश्यक आहे. तसेच कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर पीपीई किट (PPE KIT) घालून उपचार करणे तसेच सुविधा सुरळीत ठेवण्याच्या सूचना यावेळी त्यांना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss