Tuesday, April 16, 2024

Latest Posts

मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात, रोज खोटं बोलतात;अजय बावसकरांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १२ वा दिवस आहे. काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीसुद्धा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. पण मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात, रोज खोटं बोलत आहेत, असा आरोप अजय बारसकर यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) हे महत्वाचे सदस्य आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून मी मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी लढत आहे. काही दिवसांपूर्वी आंतरवली सराटीमध्ये घडलेल्या घटनेनंतर मी सुद्धा या आंदोलनात पुन्हा एकदा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मीसुद्धा अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनामध्ये सहभागी झालो. मी याआधी कधीच माध्यमासमोर आलेलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काहीच नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहतात. आमचा समाज खूप साधा भोळा आहे. मी यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांगे यांना मसुदा समजवायचो. मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे. मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करतोय असं काही नाही. मी कीर्तनाचे पैसे घेत नाही.आताच हे का झालं तर काही दिवसापासून माझ्या मनातील खदखद मी व्यक्त केली. मला अनेक फोन येत आहेत, गोळ्या घालून मारू. माझं काम सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईल म्हणून पाणी प्याले नाही. मला तिथे म्हणाला संत फिंत गेले खड्यात. तिथून माझा वाद सुरु झाला, असे अजय बारसकर म्हणाले.

२३ डिसेंबरला काहींसोबत गुप्त मिटिंग घेण्यात आली होती. त्याचा मी साक्षी आहे. रांजन गाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग घेतली होती. लोणावळा, वाशी येथे सुद्धा समाजाला वगळून मीटिंग केली होती. वाशी आंदोलन इथंवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय. सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता, असे अजय बावसकर म्हणाले.

हे ही वाचा: 

‘त्यांचं’ निधन ही सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी- Ajit Pawar

EXCLUSIVE : शेतकरी हा अन्नदाता, बळीराजा, मायबाप आहे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss