Tuesday, April 16, 2024

Latest Posts

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा करणार आमरण उपोषण

मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटी मध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटी मध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत. सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा एकदा मनोज जरांगे आंदोलनासाठी बसले आहेत. या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे लाखो आंदोलकांना घेऊन मुंबईच्या दिशेने आले होते. त्यावेळी सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवीन अध्यादेश काढला आणि मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र सरकारने काढलेल्या अद्यादेशावर अंमलबजावणी न झाल्याने आजपासून (१० फेब्रुवारी) मनोज जरांगे आंदोलनासाठी बसले आहे.

मनोज जरांगे आजपासून मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी आंतरवली सराटीमध्ये आंदोलनासाठी बसले आहेत. नवीन अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी १० तारखेला आंदोलनासाठी बसणार हे मनोज जरांगे यांनी सांगितले होते. सरकारने सगेसोयऱ्यांबाबत कायदा पारित करावा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे आजपासून सकाळी १० वाजता उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे यांनी या उपोषणाला बसण्याधी गोदा पट्ट्यातील आंदोलकांसोबत बैठक घेतील आणि पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्प्ष्ट केली आहे. त्यांचे आंतरवली सराटीमध्ये चौथे उपोषण आहे. राज्यातील मराठा समाजाचा पुन्हा एकदा घात होवू नयेत, त्यामुळेच पुन्हा उपोषण करणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. पुढील दोन दिवसांत सगेसोयऱ्यांबाबत काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करावी. मागासवर्ग आयोगाने जो अहवाल दिलेला आहे, त्याहीबाबत विशेष अधिवेशनात कायदा पारित करून न्यायालयासमोर तो अहवाल सादर केला पाहिजे. मात्र, जोपर्यंत अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नसून, आजपासून सुरु होणारे आमरण उपोषण कठोर उपोषण असणार आहे,असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

मागील काही दिवसांपासून मराठा ओबीसी वाद सुरु आहे. सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे तर मंत्री छगन भुजबळ यांनी या अध्यादेशाला विरोध केला आहे. या अध्यादेशा विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा काही ओबीसी नेत्यांनी दिला आहे. नवीन अध्यादेश लागू करण्यात आला तर ओबीसी नेत्यांकडून विरोध केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा: 

हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला भारतरत्न मिळायला हवा – Raj Thackeray

घोसाळकरांवरील हल्ल्यावेळी सातवी गोळी कोणी झाडली? बेफिकीरीने गेला जीव | Abhishekh Ghosalkar | Firing

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss