Saturday, July 27, 2024

Latest Posts

नाना पटोले यांनी काढला मनोज जरांगे यांचा बाप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आज आंतरवली सराटी गावात महत्वाची बैठक बोलावली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आज आंतरवली सराटी गावात महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यातील नेत्यांना बोलवण्यात आले आहे. मराठा समन्वयक, उपोषणकर्ते, साखळी उपोषणकर्ते, मराठा समाजातील वकील, डॉक्टर, प्राध्यापक आणि मराठा आरक्षण विषय तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. त्यावेळी नाना पटोले यांचे वक्तव्य समोर आले आहे. यामध्ये त्यांनी नाना पटोले यांनी मनोज जरांगे यांचा बाप काढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथे गेले होते. यावेळी बोलताना पटोले यांची जीभ घसरली. त्यांनी मनोज जरांगे यांचा बाप काढला. नाना पटोले म्हणाले, जरांगे पाटील म्हणतात मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. पण ज्यांचा बापचे मराठा प्रमाणपत्र असेल, आजोबाचे मराठा प्रमाणपत्र आहे, त्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र कशाला हवे..? असा सवाल करीत मनोज जरांगे पाटील यांना खडे बोल सुनावले. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर नारायण राणे, छगन भुजबळनंतर आता नाना पटोले यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रमाणपत्र घेताना आपल्या स्वत: जावे लागते. त्यावेळी आपली वंशावळी द्यावी लागते. आम्ही ओबीसी असून ओबीसीची कागदपत्रे नसतील तर आम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही. परंतु आता आरक्षणाच्या विषयामुळे महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी हे मुद्दे बाजूला गेले. शेतकऱ्यांचे प्रश्न मागे गेले. विधानसभेत आपण हे विषय मांडत असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले आहेत.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर नारायण राणेंनी विधी भूमिका घेतली आहे. त्यातच आता नाना पटोले यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे एकीकडे मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे राजकीय नेते कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुनरुच्चार केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण डिअर असल्याचे स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

Parbhani मध्ये ट्रॅक्टर आणि क्रुझरचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर…

संसदेच्या सुरक्षेच्या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss