सध्या महामार्ग आणि अपघात हे जणू काय नवीन समीकरणच बनला आहे. मागील काही दिवसांमध्ये या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे. नुकताच काल दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी नागपूरमध्ये एक भीषण अपघात झाला होता. आणि आता परभणी (Parbhani) मध्ये मोठा अपघात हा झाला आहे. परभणीच्या (Parbhani) यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या परतुर येथील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला आहे.
परभणी मध्ये भाविकांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला परंतु हा अपघात इतका मोठा होता कि यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जण जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील परतुर येथील ब्राह्मण वाडीचे एकूण ९ जण परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर परत जात असताना पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ ट्रॅक्टर आणि क्रुझरमध्ये मध्यरात्री भीषण अपघात झाला. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील वडी पाटीजवळ ट्रॅक्टर आणि क्रुझरमध्ये भीषण अपघात झाला असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच, पोलिसांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले. सोबतच, जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त दोन्ही वाहनं रस्त्याचा बाजूला केले.
हा अपघात इतका भीषण होता की, अडकलेली क्रूजर गाडी जेसीबीने बाहेर काढावी लागली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सोबतच जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गाडीतील अमोल मारुती सोळंके, अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके, दिगंबर भिकाजी कदम या 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कृष्णा सखाराम सोळंके, उमेश भारत सोळंके, संतोष कुंडलिक पांचाळ, अविनाश चंदू पाटील सोळंके, दशरथ सुदामराव, किशोर सोळंके हे 6 जण जखमी झाले असुन, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
हे ही वाचा :
धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज उद्धव ठाकरे आक्रमक, काय आहे मागण्या घ्या जाणून सविस्तर माहिती…
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या सविस्तर