Sunday, April 28, 2024

Latest Posts

गौरी खानचं नव्या क्षेत्रात पदार्पण,सुरु केलं मुंबईत स्वतःचं पहिलं रेस्टॉरंट

शाहरुखखान याच्याप्रमाणेच त्याची पत्नी गौरी खान देखील अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. गौरी खान एक उत्तम इंटेरियर डिझायनर आहे.

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान याने सिनेसृष्टीत आपली स्वतःची मजबुत ओळख निर्माण केली आहे.शाहरुख खान हा आजच्या घडीतला टॉप १चा अऊनेता आहे.शाहरुख खान हा नेहमीच आपले प्रोफेशन आणि वैयक्तिक आयुष्य यांना कधीच एकत्र आणत नाही.अशातच आता शाहरुखखान याच्याप्रमाणेच त्याची पत्नी गौरी खान देखील अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.
गौरी खान एक उत्तम इंटेरियर डिझायनर आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घराचं इंटेरियर गौरी हिने केलं आहे.आता गौरी हिने हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं आहे. मुंबईतील जुहू याठिकाणी गौरी हिचं आर्किटेक्‍चर स्टूडियो आहे. फक्त मुंबईमध्येच नाही तर, दिल्ली आणि चंदीगड याठिकाणी देखील गौरी हिचं आर्किटेक्‍चर स्टूडियो आहेत. गौरी हिने आता मुंबईत स्वतःचं पहिलं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. गौरी खान हिच्या रेस्टॉरंटचं नाव ‘टॉरी’ असं आहे. खुद्द गौरी हिने रेस्टॉरंट ‘टॉरी’ ची एक झलक सोशल मीडियाच्याम माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

व्हिडीओमध्ये गौरीने रेस्टॉरंट ‘टॉरी’चा प्रत्येक कोपरान कोपरा  दाखवला आहे. गौरी खानने तिचं पहिलं रेस्टॉरंट ‘टॉरी’ अत्यंत महागड्या वस्तूंनी सजवलं आहे. व्हिडीओमध्ये गौरी रेस्टॉरंट ‘टॉरी’बद्दल सांगताना दिसत आहे. गौरीने ‘टॉरी’ नावाचा अर्थ देखील सांगितला आहे. ‘टॉरी म्हणजे मंदिराचा प्रवेशद्वार…’ एवढंच नाहीतर, गौरीने रेस्टॉरंटसाठी वापरण्यात आलेल्या रंगांचं देखील महत्त्व सांगितलं आहे.गौरीने रेस्टॉरंटमध्ये लाल आणि हिरव्या रंगाचा अधिक वापर केला आहे. रेस्टॉरंटमधील वातावरण अधिक फ्रेश आणि मोकळ करण्यासाठी लाल आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. चाहत्यांना देखील गौरी खान हिचा पहिल रेस्टॉरंट प्रचंड आवडला आहे.

गौरी खान हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी गौरी हिला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहे. सध्या सर्वत्र गौरी खान हिच्या रेस्टॉरंटची चर्चा रंगली आहे. जेव्हा गौरी हिने रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं, तेव्हा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.गौरी खान बॉलिवूडमधील अभिनेत्री नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील गौरी खान कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरी तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

हे ही वाचा:

वेलची आणि दुध शरीरासाठी ठरतात गुणकारी,जाणुन घ्या फायदे

मृत्यूच्या खोट्या बातमीनंतर पूनम पांडे पहिल्यांदाच दिसली बाहेर,घेतले देवाचे दर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss