Sunday, April 28, 2024

Latest Posts

महाराष्ट्राचा कोहिनूर हरपला; सर्वपक्षीय नेत्यांकडून Manohar Joshi यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

शिवसेनाप्रमुखांसारख्या आक्रमक नेतृत्वाशी फक्त जवळीकच नव्हे तर त्यांच्या ‘रिमोट कंट्रोल’ ला सर्वाधिक प्रतिसाद देणाऱ्या मनोहर जोशींनी रांगड्या शिवसैनिकांसमोर शून्यातून विश्व निर्माण करण्याचा अनोखा आदर्श ठेवला.

शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेत पहिल्या फळीत नेतृत्व करताना नगरसेवक ते लोकसभा अध्यक्ष आणि त्यानंतरही राज्यसभेचा सदस्य होताना देशातील सगळ्याच पक्षांशी राजकारणारलिकडे संबंध जपणाऱ्या डॅा. मनोहर जोशी यांचे मुंबईत आज पहाटे निधन झालं. शिवसेनाप्रमुखांसारख्या आक्रमक नेतृत्वाशी फक्त जवळीकच नव्हे तर त्यांच्या ‘रिमोट कंट्रोल’ ला सर्वाधिक प्रतिसाद देणाऱ्या मनोहर जोशींनी रांगड्या शिवसैनिकांसमोर शून्यातून विश्व निर्माण करण्याचा अनोखा आदर्श ठेवला.

शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते, माजी लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी महापौर तसेच कोहिनूर टेक्निकल इस्टिट्यूटचे संस्थापक मनोहर जोशी (८६) यांचे आज पहाटे हिंदुजा रुग्णालयात ह्रदयविकाराने निधन झाले. संध्याकाळी शिवाजी पार्क येथील भागोजी किर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपासून सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. महाराष्ट्राचा कोहिनूर हरपला अशा शब्दात अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना बुधवारी हिंदुजा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ब्रेन हॅमरेजशी लढा

यापूर्वी मनोहर जोशी यांना २४ मे २०२३ रोजी ब्रेन हॅमरेज झाले होते. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. सुमारे एक महिना हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ब्रेन हॅमरेजवर उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. पण दोन दिवसांपूर्वी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुन्हा हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेर त्यांचे निधन झाले. मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसैनिकांनी मांटुगा येथील निवासस्थानी धाव घेतली. रुपारेल महाविद्यालयाजवळील डब्ल्यू ५४ या इमारतीत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

सर्वपक्षीय नेत्यांकडून अंत्यदर्शन

शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांपासून शिवसैनिकांनी गर्दी केली होती. राज्यपाल रमेश बैस, शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, ज्येष्ठ शिवसैनिक सु. ना. जोशी, विश्वानाथ नेरुरकर, माजी महापौर महादेव देवळे, विशाखा राऊत, दत्ता दळवी, श्रध्दा जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे, तसेच संदीप देशपांडे, अमेय खोपकर, साईनाथ दुर्गे, समीर भुजबळ, उद्योगपती विठ्ठल कामत, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार राहुल शेवाळे, पूनम महाजन ,रामदास आठवले, आमदार सुनील प्रभू, रवींद्र वायकर, संजय पोतनीस, विलास पोतनीस, सचिन अहिर, कपिल पाटील, प्रविण दरेकर, कालीदास कोळंबकर, सदा सरवणकर , केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिवसेना नेते लिलाधर डाके, दिवाकर रावते, भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे तसेच मिलिंद देवरा, शिशिर शिंदे, विनोद खोपकर, सुरेश गंभीर, बाबा दळवी, दिगंबर कांडरकर, सचिन पडवळ, राजन शिरोडकर, प्रविण बर्वे, प्रविण देव्हारे यांच्यासह अनेक जुन्या पिढीतील शिवसैनिकांनी मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

हे ही वाचा:

गौरी खानचं नव्या क्षेत्रात पदार्पण,सुरु केलं मुंबईत स्वतःचं पहिलं रेस्टॉरंट

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी Amit Thackeray यांचा धडक मोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss