Saturday, July 27, 2024

Latest Posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाज उघड पाडणार, मनोज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाज उघड पाडणार, मनोज जरांगेंचा इशारा इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सगळीकडे वातावरण खवळले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सगळीकडे वातावरण खवळले आहे. मनोज जरांगे यांच्या २ आंदोलनानंतर राज्य सरकार कामाला लागले आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. ही मुदत आता संपत आली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा करत आहेत. मनोज जरांगे हे सभा आणि दौरे करून वातावरण तापवत आहेत. सरकार २४ डिसेंबर पर्यंत काय करत ते पाहू, आमचं त्यांच्याकडे लक्ष आहे. आमच्या लेकरांबाबत विधीमंडळात हे काय करतायेत याकडेही आमचं लक्ष असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. फडणवीस यांना मराठे पुन्हा उघडे पाडणार आहेत. त्यांनी दबावात न येता जी होती ती भूमिका घ्यावी, असेही आव्हान मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिले आहे.

मी मराठा समाजाची बाजू लावून धरली आहे. ते किती गांभीर्याने घेतात हे मला माहीत नाही. आमच्या लेकराचं हित आमच्यासाठी महत्वाचं आहे. आम्ही सरकार २४ डिसेंबरपर्यंत काय करणार आहे ते पाहू आमचे लक्ष आहे. आपल्या लेकरांना काय न्याय देतात हे आम्ही पाहणार आहोत. २४ डिसेंबरनंतर यांच्या लक्षात येईल की आम्ही काय आहोत. आमचं आंदोलन शांततेत होणार आहे. पण त्यांना याआधी झाला नसेल एवढा पश्चाताप होईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आरक्षण मिळविण्याची ताकद सामान्य माणसात आहे. या पांढरे कपडे घालणाऱ्यांमध्ये नाही. नेत्यांनी वयाचा विचार करून बोललं पाहीजे. अशा माणसांनी दंगलीच्या गोष्टी करू नये. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला आहे. फडणवीस यांच्या मूळ भूमिकेवर येतील ते खऱ्या आणि पूर्वीच्या भूमिकेवर येतील अशी आशा आहे. त्यांनी दबावाखाली येऊ नये. अन्यथा त्यांनाही उघडे पाडले जाईल. भुजबळाचं ऐकल्याचा पश्चाताप त्यांना होईल, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत.

कंधारमध्ये कुणबी नोंदी सापडल्या असूनसुद्धा अधिकाऱ्यांनी नाही सांगितले. त्यांनी निरंक आव्हाल लिहिला आहे. पण अभ्यासकांना तिथे 27 नोंदी सापडल्या आहे. मग अधिकारी जाणूनबुजून नोंदी नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अश्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठवाड्यात कमी नोंदी मिळत आहेत कारण कारण अभ्यासक नाहीत. अधिकारी मुद्दामहून मनुष्यबळ देत नाहीत, वेळ देत नाहीत,याबाबत सरकारने काही केले तर २४ तासांत फरक पडेल. याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

मनोज जरांगे यांची ज्या मैदानात सभा झाली त्याच मैदानावर आज भुजबळांची तोफ धडाडणार

MAHARASHTRA: कांद्याचा भाव वाढणार, कारण काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss