Saturday, March 2, 2024

Latest Posts

MAHARASHTRA: कांद्याचा भाव वाढणार, कारण काय?

लसूण (GARLIC) च्या वाढत्या भावानंतर आता कांद्याच्या (ONION) भावाने मजल गाठली आहे. केंद्र सरकारकडून आता कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. नाशिक आणि पुण्यात अनेक बाजार समित्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा कांद्याचा लिलाव बंद करण्यात आला आहे. यामुळे बाजारती कांदा महागण्याची शक्यता आहे.

कांद्याची बाजारातील किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी जाहीर केली आहे. त्यामुळे, राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचा बंद करण्यात आला होता. याच गोष्टीचा परिणाम बाजारात होणार आहे. किरकोळ बाजारात आवक नसल्यामुळे कांदा महाग होऊ शकतो. नाशिक जिल्ह्यात असलेल्या लासलगाव सहप्रमुख १५ बाजार समिती आणि दोन खाजगी अशा १७ एकूण बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून घेण्यात आला आहे.कांद्याच्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यात विंचूर येथे दोन दिवसांपासून कांद्याचे दर सोळाशे रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे कांद्याचे उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांना कोटी रुपयांचा फटका बसला आहे. उपबाजार विंचूर येथे कांद्याला २९०१ तर सरासरी २२०० रुपये दर मिळाला आहे.कमीतकमी दर १००० हजार रुपये प्रतिक्विंटल होता. तर गुरुवारी कांद्याला जास्तीत जास्त ४५०१, सरासरी ३८०० रुपये तर कमीतकमी २००० हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता.

हे ही वाचा:

जमिनीचा वाद विकोपाला पोचला, पाच मामांच्या मारहाणीत भाच्याचा मृत्यू

Trending: आदित्य L1 ने घेतला सूर्याचा पहिला फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss