Saturday, March 2, 2024

Latest Posts

मनोज जरांगे यांची ज्या मैदानात सभा झाली त्याच मैदानावर आज भुजबळांची तोफ धडाडणार

मागील काही महिन्यांपासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी जीवाचे रान करत आहेत.

मागील काही महिन्यांपासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी जीवाचे रान करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मागणीसाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आक्रमक होताना दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) पहिली ओबीसी एल्गार सभा ही पुणे (Pune) जिल्ह्यातील इंदापूरमध्ये होत आहे. आज दुपारी १ वाजता ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला जवळपास पश्चिम महाराष्ट्रातून दीड लाख ओबीसी बांधव येण्याची शक्यता आहे.

राज्यभरात ठिकठिकाणी ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आधी जालना आणि हिंगोली जिल्ह्यात ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील तिसरा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिला ओबीसी एल्गार मेळावा आज पुणे जिल्ह्यामधील इंदापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ज्या शंभर फुटी मैदानात मनोज जरांगे यांची सभा झाली त्याच मैदानात भुजबळ यांची सभा होणार आहे. त्यामुळे आजच्या या मेळाव्यात भुजबळ नेमके काय बोलणार यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इंदापूर शहरा जवळ असलेल्या शंभर फूट मैदानात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे याआधी या मैदानात जरांगे यांची सभा झाली होती. या ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, शब्बीर अन्सारी, प्रा. टी. पी. मुंडे, बबनराव तायवाडे, लक्ष्मण गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चोथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा करत आहेत. त्यात मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पाहायला मिळत आहे. आपल्या प्रत्येक सभेमध्ये जरांगे हे भुजबळ यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. त्यामुळे आजच्या सभेमध्ये पुन्हा एकदा भुजबळ हे जरांगे यांच्यावर निशाणा साधण्याची शक्यता आहे. तसेच इतर ओबीसी नेत्यांकडून जरांगे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यातील प्रमुख नेत्यांची भाषण महत्वाची आहे. इंदापूर येथील भुजबळ यांच्या ओबीसी मेळाव्यात राज्य मागास आयोगाचा राजीनामा दिलेले सदस्य लक्ष्मण हाके उपस्थित असणार आहेत.

हे ही वाचा:

Amruta Fadnavis म्हणतायत,‘तुम्हें आईने की जरुरत नहीं’ | Amruta Fadnavis | New Song

Trending: आदित्य L1 ने घेतला सूर्याचा पहिला फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss